Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मास्कबद्दल प्रश्न, राज ठाकरे म्हणाले, कोरोना इतकाच वाढत असेल तर निवडणुकाही पुढे ढकला!

आगामी महामालिकेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकला," असा खोचक सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. (raj thackeray corona pandemic municipal corporation election)

मास्कबद्दल प्रश्न, राज ठाकरे म्हणाले, कोरोना इतकाच वाढत असेल तर निवडणुकाही पुढे ढकला!
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 11:33 AM

मुंबई : “राज्यात सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. ते धुडगुस घालतात. मात्र, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली जाते. जर एवढाच कोरोना वाढत असेल तर आगामी महामालिकेच्या निवडणुकासुद्धा पुढे ढकला,” असा खोचक सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला दिला. मनसेतर्फे मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रमक आयोजित करण्यात आला होता. मात्र, कोरोना संसर्गाचे कारण देत मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ठाकरे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.  (raj thackeray criticizes state government on corona pandemic said municipal corporation election should have to postpone)

“राज्यात सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमध्ये जे मंत्री आहेत किंवा इतर लोक आहेत ते गर्दी करतात. ते धुडगुस घालतात. मात्र, शिवजयंतीसारख्या उत्सवाला नकार दिला जातो. मराठी भाषा दिनाला नकार दिला जातो. जर एवढंच कोरोनाचं संकट येत असेल तर, महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकला. महापालिकेच्या निवडणुका वर्षभारानंतर घ्या. काही फरक पडत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.

आगामी काही दिवसांत राज्यात कल्याण डोंबिवली, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, वसई विरार, नवी मुंबई या महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने राज्यातील विविध पक्षांनी तयारीही सुरु केलेली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाचा संसर्गही वाढत असल्यामुळे सरकारने राज्यात अनेक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तसेच एखादा समारंभ आयोजित करायचा असेल, तर त्यासाठी सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मनसेने मुंबईतील शिवाजी पार्कवर कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी कोरोनाचे कारण देत या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.  यावेळी बोलताना त्यांनी कोरोना आणि महापालिकेच्या निवडणुका या मुद्द्यांरुन वरील भाष्य केले. त्यांनी महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकला, असा खोचक सल्ला राज्य सरकारला दिला.

दरम्यान, राज यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज यांच्यानंतर इतरही नेतेमंडळी महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करु शकतात, असे म्हटले जात आहे.

इतर बातम्या :

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का?

धक्कादायक, अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी; हाजी अली जंक्शनलाही 10 मिनिटे कार थांबली

(raj thackeray criticizes state government on corona pandemic said municipal corporation election should have to postpone)