सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता रुग्णालयात, राज ठाकरेंवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?

| Updated on: Apr 10, 2021 | 7:10 PM

राज ठाकरे यांच्या कंबरेचा स्नायू दुखत असून त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. (raj thackeray undergo Surgery)

सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहता रुग्णालयात, राज ठाकरेंवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया?
राज ठाकरे, मनसेप्रमुख
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्याचा कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊन या विषयावर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्यासंबंधीची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कंबरेचा स्नायू दुखत असून त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. (Raj Thackeray feeling pain in waist he will undergo small medical Surgery)

राज ठाकरे यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया ?

राज ठाकरे यांच्या कंबरेला त्रास होतोय. त्यांच्या कंबरेचा स्नायू दुखत आहे. याच कारणामुळे त्यांना बसण्यास त्रास होत आहे. राज ठाकरे मागील 3 दिवसांपूर्वी उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर एमआरआयची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या कंबरेच्या स्नायुवर शस्त्रक्रिया होणार आहे. कंबरेच्या स्नायुवर होणारी ही एक छोटी शस्त्रक्रिया असून फार गंभीर बाब नसल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शत्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच राज यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाईल.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशी

परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी VC द्वारे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी कोरोनाच्या स्थितीवर चर्चा झाली होती. याच वेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कंबरेच्या त्रासाबद्दल विचारलं होतं. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांना लीलावती रुग्णालयातील काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत असेदेखील सुचवले होते.

सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित

राज यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरल्यामुळे त्यामुळे ते आजच्या (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाईल.

इतर बातम्या :

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : धक्कादायक ! नागपूरात व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नाहीत

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका

Maharashtra lockdown all party meeting Live : यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये, लॉकडाऊनची वेळ आलीय : मुख्यमंत्री

(Raj Thackeray feeling pain in waist he will undergo small medical Surgery)