मुंबई : येणाऱ्या गुढी पाडव्याची (Gudipadwa) सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. त्यातल्या त्यात मनसैनिकांना राज ठाकरेंच्या (Raj Thackeray Speech) तडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या वेळी वर्धापन दिनाला राज ठाकरेंनी पुण्यात अनेकांचा समाचार घेतला. मात्र यावेळी बोलता बोलता राज ठाकरे म्हणाले हे माझं आजचं भाषण म्हणजे फक्त टिझर (Mns Teaser) आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असे थेट संकेत दिले होते. त्यामुळ या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांपासून राजकीय सभांवर काही मर्यादा आल्याने राज ठाकरे नावाची नेहमी धडाडणारी तोफ काही काळ थंड होती. मात्र आता कोरोनाही कमी झाल्याने सण साजरे करायला थोडीफार मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे शिवतिर्थावर पुन्हा राज ठाकरेंची थोफ विरोधकांना घायळ करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Raj Thackeray यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणासाठी मनसेचा टिझर….@RajThackeray @mnsadhikrut pic.twitter.com/fGuiZ2eXor
— Abhishek karande (@Abhishekkaran16) March 31, 2022
गुढी पाढव्याच्या भाषणासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एक छोटासा टिझरही बनवण्यात आला आहे. त्याला बॅकग्राऊंड म्युझिकसह पुण्यातला राज ठाकरेंचा बाईट लावण्यात आला आहे. त्यात राज ठाकरे म्हणतात, आज हे माझं भाषण फक्त टिझर आहे, पिक्चर 2 एप्रिलला शिवतिर्थावर गुढीपाढव्याला, असा आवाज त्याला देण्यात आला आहे. सोबतच टाळ्या, शिट्ट्या आणि ढोल-ताशांचा आवाजही देण्यात आला आहे. हा टिझर बाहेर आल्यापासून याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. यावर कमेंट आणि लाईक्सचाही पाऊस पडतोय. या टिझरने राज ठाकरेंच्या भाषणाची उत्सुक्ता आणखी वाढवली आहे. गुढी पाडव्याचं भाषण तुफानी होणार एवढं सांगयला हा टिझर पुरेसा आहे.
राज ठाकरेंनी गेल्या भाषणावेळी भाजप पासून ते शिवसेनेच्या संजय राऊतांपर्यंत सर्वांचा समाचार घेतला होता. एवढच काय राज ठाकरेंनी पुण्यातल्या भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही सोडलं नव्हतं. त्यामुळे आता गुढी पाडव्याच्या भाषणात मेन टार्गेट कोण अशा राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सहाजिक काही दिवसात मुंबई महापालिकेसह काही मोठ्या महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी राज ठाकरेंनी आधीत दौऱ्यांचा आणि बैठकांचा सपाटा लावला आहे. मुंबई महापालिक लढवण्यासाठीही जोरदार तयारी सुरू केली आहे. बोरीवलीत त्यांनी बोलताना यावेळी विरोधकांना हाणायचं म्हणजे, हाणायचं म्हणतं स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे हे भाषण वादळी ठरणार एवढं मात्र नक्की.