Nitin Gadkari Raj Thackeray meet : राज ठाकरे-नितीन गडकरींच्या भेटीवर भाजप नेते म्हणतात हिंदुत्वाबाबत ठोस भूमिका घेतल्याने…
राज ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत ठोस भूमिका घेतल्याने आता राजकीय चर्चाही सकारात्मक होऊ शकते, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसोबत भविष्यात पुन्हा कधी युती होईल असे वाटत नाही म्हणत शिवसेनेला आणखी दूर ढकलून दिलं आहे.
मुंबई : राज ठाकरेंनी पुण्यातून दिलेल्या पिक्चरची हिंट सध्या राजकारण बदलवून टाकत आहेत. शिवतीर्थावर शनिवारी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) हिंदुत्वाची भूमिका आणखी उचलून धरत असा पिक्चर हीट केला की त्यावरून आता राजकारण पालटताना दिसून येत आहे. काल शिवतिर्थावर राज ठाकरेंनी केलेल्या तडाखेबाज भाषणानंतर आज लगेच नितीन गडकरी आणि राज ठाकरेंची (Nitin Gadkari) भेट हे युतीचे संकेत आहेत का? (Mns Bjp Alliance) अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवाय आज दिवसभर भाजप नेतेही राज ठाकरेंवर कौतुकांच्या फुलांचा वर्षाव करत आहेत. आता राज ठाकरे आणि नितीन गडकरींच्या भेटीबाबत भाजप नेत्यांना विचारले असता, त्यांचाही सूर बदललेला दिसतोय. राज ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत ठोस भूमिका घेतल्याने आता राजकीय चर्चाही सकारात्मक होऊ शकते, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेसोबत भविष्यात पुन्हा कधी युती होईल असे वाटत नाही म्हणत शिवसेनेला आणखी दूर ढकलून दिलं आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
नितीन गडकरींचा कार्यक्रम नियोजित नसताना गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने आता युतीच्या वाटेवर दोन्ही पक्ष निघाल्याच्या चर्चा रंगत आहे. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांचं घनिष्ठ संबंध आहेत. ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत, दोन मित्रांची ही भेट आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल, हे मला माहीत नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. नितीन गडकरी आणि राज ठाकरेंच्या भेटी अनेकदा झाल्या आहे. मात्र काल राज ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीच्या विचाला समर्थनार्थ भाष्य केलं. आणि गडकरींनी त्यांची भेट घेतली त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या. मात्र युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव अजून आला नाही. त्यामुळे पुढच्या बैठीकत हा विषय आल्यास याबाबत चिंतन आणि मंथन होईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहे.
अमोल मिटकरींचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर
शिवसेनेचे हिंदुत्व शिवसेनेने संपवले आहे. ज्या काँग्रेसला हिंदुत्व या शब्दाचा तिटकारा होता. त्या शिवसेनेसोबत पुन्हा कधी युती होईल असे वाटत नाही, असेही मुनगंटीवर म्हणाले. याबाबतचा निर्णय आमच्या कोर टीममध्ये होईल. भविष्यात समविचारी पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ शकतात, असेही संकेत मुनगंटीवरांनी दिले आहेत. ही भेट अचानक नव्हती. हे सर्व ठरलेलं होतं, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. काल राज ठाकरेंनी केलेलं भाषण भाजपची ब्लू प्रिंट होती. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून त्यांना गुजरातला न्यायची आहे. म्हणून राज ठाकरेंना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आगामी काळात यांची अभद्र युती झाली तरी ते घसरून खाली येतील असेही ते म्हणाले. जसा रावणाचा जीव बेंबीत होती, तसा भाजपचा जीव मुंबईत आहे, असाही टोला मिटकरींनी लगावला आहे.
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भेटीला नितीन गडकरी, “शिवतीर्थ”वरील भेटीत युतीची चर्चा?