शिवाजी पार्क प्रकल्पाच्या निविदा रोखण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र; तर आदित्य ठाकरे म्हणतात, घाई करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिलं. (Raj Thackeray Shivaji Park Aditya Thackeray)

शिवाजी पार्क प्रकल्पाच्या निविदा रोखण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र; तर आदित्य ठाकरे म्हणतात, घाई करा
राज ठाकरे, आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 12:22 PM

मुंबई : दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) नूतनीकरण प्रकल्पात मनसे उडी घेणार, याचा अंदाज येताच शिवसेनेकडून प्रकल्पासाठी निविदा काढण्याची घाई करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. (Raj Thackeray requests to stop Shivaji Park tender Aditya Thackeray asks to hurry up)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहिलं. शिवाजी पार्क नूतनीकरणाच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया थांबवण्याची विनंती त्यांनी केली, दुसरीकडे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई शिवसेना आणि प्रशासन करताना दिसत आहे.

निविदेची जाहिरातही

आदित्य ठाकरे यांनी काल शिवाजी पार्क प्रकल्पाबाबत मुंबई महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कच्या मुद्यावरुन आता शिवसेना-मनसे आमने सामने येणार आहेत.

मनसेचे इक्बाल चहल यांना पत्र

शिवतीर्थाची देखभाल करण्यास दररोज हजारो लिटर पाणी वाया जाते. शिवाजी पार्क मैदानात जलसंचयन प्रकल्प पुन्हा सुरु करत असल्याचं आपल्याला समजलं. या प्रकल्पाला चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पालिकेने पैसे खर्च करु नयेत. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा प्रकल्प सामाजिक बांधिलकी निधी (सीएसआर फंड) मधून राबवावा, अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली.

आम्ही सीएसआर फंडातून शिवाजी पार्कमध्ये प्रकल्प पर्जन्य जलसंचयन राबवतो. आम्हाला प्रकल्प राबवण्याची परवानगी द्या आणि नूतनीकरण प्रकल्पासाठी सुरु असलेली निविदा प्रक्रिया थांबवा, यापूर्वी आम्ही शिवाजी पार्कवर हा प्रकल्प राबवला आहे, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. महापालिका आयुक्त निविदा प्रक्रिया थांबवणार का? आता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(Raj Thackeray requests to stop Shivaji Park tender Aditya Thackeray asks to hurry up)

शिवाजी पार्कवर काय बदलणार?

राज्य सरकारने शिवाजी पार्कच्या सुधारणेसाठी 6 कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय. या निधीच्या मदतीने शिवाजी पार्क परिसरात वेगवेगळे प्रकल्प राबवले जातील. येथील मैदानातून उठणाऱ्या धुळीचा बाजूला राहणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. तसेच हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानात सुधारणा केली जाणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प उभारून याच पाण्याच्या मदतीने शिवाजी पार्कची माती ओली केली जाईल. त्यामुळे हवेत उठणारी धूळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, शिवाजी पार्कमैदानावर स्ट्रॉम वॉटर ड्रेन तयार करणार केली जाणारआहे.

संबंधित बातम्या :

शिवाजी पार्कचा चेहरामोहरा बदलणार; न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्कच्या धर्तीवर होणार विकास

(Raj Thackeray requests to stop Shivaji Park tender Aditya Thackeray asks to hurry up)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.