Raj Thackeray : राज ठाकरेंची गाडी भाजपच्या अंगणी, भाजप कार्यालयासमोरील गाडीची चर्चा

मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांणी जोर धरला आहे. अशात राज ठाकरेंची गाडी भाजप कार्यलयासमोर दिसून आल्याने चर्चांणा उधाण आले आहे. हा नेमका प्रकार काय आहे, याचाही शोध आम्ही घेतला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंची गाडी भाजपच्या अंगणी, भाजप कार्यालयासमोरील गाडीची चर्चा
राज ठाकरेंची गाडी भाजपच्या अंगणी, भाजप कार्यालयासमोरील गाडीची चर्चाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 6:52 PM

मुंबई : अलिकडेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाची (Hindutva) भूमिका चांगलीच उचलून धरली आहे. अशातच भाजप नेत्यांकडूनही राज ठाकरेंचं कौतुक सुरू आहे. भाजप नेते राज ठाकरेंच्या मशीदीवरील भोंगे उतरवण्याच्या भूमिकेलाही खुलेपणे पाठिंबा देत आहे. काही दिवसातच राज्यात बड्या महापालिका (Bmc Election) आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. आणि अशा वेळी भाजप नेत्यांनी राज ठाकरेंच्या सुरात सुर मिसळला आहे, तसेच राज ठाकरेही भाजपबाबत टीकेचा चकार शब्दही काढत नाही, उलट योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करत आहेत. तर महाविकास आघाडीवर अवकाळीत बरसलेल्या गारा बरसाव्या तसे बरसत आहेत. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चांणी जोर धरला आहे. अशात राज ठाकरेंची गाडी भाजप कार्यलयासमोर दिसून आल्याने चर्चांणा उधाण आले आहे. हा नेमका प्रकार काय आहे, याचाही शोध आम्ही घेतला आहे.

गाडी भाजपच्या प्रदेश कार्यालयासमोर दिसली

राज ठाकरे यांची गाडी आज भाजप च्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यलया बाहेर उभी राहिली आणि सर्वांच्या भुवया एकदम उंचावल्या .एम एच 46 जे 9 गाडी चा नंबर आहे. 9 हा राज ठाकरे यांचा लक्की नंबर आहे, हे सर्वश्रुत आहेच. या गाडीत राज ठाकरे यांनी अनेकवेळा प्रवास केलाय. राज ठाकरे यांची गाडी भाजप कार्यलय समोर कशी काय असा प्रशन सर्वानाच पडला? तर अशी माहिती समोर आली की एस के मोटर्सचे मालक सतीश कोठावळे यांना ही गाडी विकली असल्याचे कळाले. कोठावळे हे त्यांचे सहकारी सहदेव पाटील यांना घेऊन भाजप प्रदेश कार्यालयात आले होते. आपण ही गाडी 14 डिसेंबरला राज ठाकरे यांच्याकडून विकत घेतली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

केवळ योगायोग

तसेच ही गाडी आज भाजप प्रदेश कार्यालयात येण्याचा योगायोग आहे, असे स्पष्टीकरण एस. के मोटर्सचे मालक सतीश कोठावळे आणि सहदेव पाटील यांना दिले आहे. सहदेव पाटील हे भाजपचे कार्यकर्ते असून रियल इस्टेटचा बिजनेस देखील आहे. सहदेव पाटील म्हणतात 9 नंबर त्यांचाही लकी नंबर आहे आणि राज ठाकरेंची वापरात असलेली गाडी घेण्याचं आकर्षण देखील होतं, त्यामुळे ही गाडी या ठिकाणी कशी आली याचा सस्पेन्स संपला आहे. मात्र काही काळ तर राज ठाकरे भाजप कार्यालयात पोहोचले की काय? असा ससपेन्स या गाडीने तयार केला होता.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.