राज ठाकरेंचा डोंबिवली दौरा, पहिली भेट जेम्स आणि बॉण्डच्या पिल्लाची
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं श्वानप्रेम (Dog Love) जगजाहीर आहे. ते आपल्या घरी असलेल्या श्वानांसोबत वेळ घालवतानाचं दृष्य अनेकांनी पाहिलं आहे.
ठाणे: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं श्वानप्रेम (Dog Love) जगजाहीर आहे. ते आपल्या घरी असलेल्या श्वानांसोबत वेळ घालवतानाचं दृष्य अनेकांनी पाहिलं आहे. त्यांच्या याच श्वानप्रेमाचं दर्शन आज डोंबिवलीतही (Dombivali) पाहायला मिळालं. पक्षाच्या डोंबिवलीतील बैठकीसाठी आले असताना त्यांनी मनसेचे नेते राजू पाटील (MNS Leader Raju Patil) यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी राजू पाटील यांच्या घरील श्वानांसोबतही वेळ घालवला.
राजू पाटील यांच्याकडे ग्रेट डेन (Great Dane Dog) जातीचा रॅम्बो (Rambo) आणि लॅब्राडॉर (Labrador Dog) जातीचा ब्रुनो असे दोन श्वान आहेत. विशेष म्हणजे यापैकी रॅम्बो हा राज यांच्या घरचे श्वान जेम्स (James) आणि बॉण्ड (Bond) यांचंच पिल्लू आहे. स्वतः राज यांनी ते राजू पाटील यांना भेट दिलं होतं. त्यामुळं जेव्हा जेव्हा राज ठाकरे डोंबिवलीत येतात, त्यावेळी ते रॅम्बोची विशेष भेट घेतात.
VIDEO: राज ठाकरेंचा डोंबिवली दौरा, पहिली भेट जेम्स आणि बॉण्डच्या पिल्लाची pic.twitter.com/rvUoiLbOrD
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2019
दरम्यान, राज ठाकरे यांना डोंबिवलीत येताना शिळफाटा ते पलावा प्रवासात खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच वाहतूक कोंडीलाही सामोरं जावं लागलं. त्यामुळे त्यांची डोंबिवलीतील पूर्वनियोजित बैठक त्यांना रद्द करावी लागली आहे. आता ही बैठक 8 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता होणार आहे.