महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला; राज ठाकरे यांनी कोणता दिला इशारा

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी त्यांचा खास ठाकरी शैलीत राज्यातील राजकारणाचा समाचार घेतला. राज्यातील राजकारणावर त्यांनी तोंडसूख घेतले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी टीका केली. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटल्याचा टोला त्यांनी लगावला.

महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला; राज ठाकरे यांनी कोणता दिला इशारा
Raj thackeray
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 9:14 PM

राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर करत अनेक मुद्यांवर भाष्य केले. मुंबईत शिवतीर्थावर त्यांनी मनसेची राजकीय भूमिका स्पष्ट केली. महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आता यानंतर राज ठाकरे यांची तोफ प्रचार सभातून धडाडणार आहे. लोकसभेत मनसे उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण विधानसभेच्या मैदानात मनसे उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील राजकीय परिस्थितीचा त्यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटलाय. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात माहीत नाही माणूस राजकारणात आला की कोणत्या पक्षात असं विचारावं लागतं, असा टोला त्यांनी लगावला.

ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी

सध्याच्या परिस्थितीत मोदींकडून अपेक्षा आहे. अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. या देशाची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणार आहे. आपण खड्ड्यात जाणार की वर जाणार. उद्या अनेक निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत काय होईल. कोथळे बाहेर काढतील. याचं कारण महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटलाय. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात माहीत नाही माणूस राजकारणात आला की कोणत्या पक्षात असं विचारावं लागतं, असा टोला त्यांनी हाणला.

हे सुद्धा वाचा

व्याभिचाराला मान्यता देऊ नका

  • या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
  • आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या ५० वर्षाचा विषय़ करायचा असतो. पण मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो. म्हटलं वाटाघाटीत पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे. मला काही अपेक्षा नाही.

तरुण हेच फ्युचर

जगात सर्वात तरुण देश आपला देश आहे. जपान ना , अमेरिका. फक्त भारत तरुण आहे. या तरुणांना तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. व्यवसायाची गरज आहे. मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे. १८ वर्ष निघून गेली. उरली १० वर्ष. दहा वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर होणार. मोदींना विनंती आहे, भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. हेच ते फ्युचर आहे. भविष्य आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.