भारत जोडो यात्रेमुळेच ‘हे’ तुम्हाला सुचतंय, आज आम्हाला मेंदूहीन राज ठाकरे दिसले…
महापुरुषांच्या दाखले तुम्ही देता, त्या महापुरुषांनी माफी मागितल्यानंतर देशात येऊन स्वातंत्र्याचा जयघोष न करता त्यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला आहे.
मुंबईः काँग्रेसची चाललेली भारत जोडो यात्रेचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. ही यात्रा करत असताना महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्यांनी माफीवीर असा उल्लेख केल्यानंतर त्यांच्यावर सर्वपक्षांनी जोरदार टीका केली. यावरून राजकारण तापलेले असतानाच आता राज ठाकरे यांनीही त्यांना मेंदूहीन म्हणून त्यांच्यावर निशाणा साधला.
त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, दुसऱ्यांची लायकी आणि दुसऱ्यांचा मेंदू काढणारे मेंदूहीन राज ठाकरे आज आम्हाला दिसून आले.
यावेळी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, तुम्ही थोर महापुरुषांच्यावर होणारी चिखलफेक थांबवा म्हटले आहे.
पण तुम्ही ज्या महापुरुषाचे नाव घेऊन राजकारण करत आहात त्या महापुरुषांनी धर्माच्या नावाखाली देशाचे विभाजन केले असल्याचे अतुल लोंढे यांनी सांगितले.
ज्या महापुरुषांच्या दाखले तुम्ही देता, त्या महापुरुषांनी माफी मागितल्यानंतर देशात येऊन स्वातंत्र्याचा जयघोष न करता त्यांनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला आहे.
त्याच बरोबर त्यांनी इंग्रजांची गुलामगिरी करुन येथील स्वातंत्र्यवीरांच्या विरोधात ते उभा राहिले असल्याचा इतिहासही अतुल लोंढे यांनी सांगितला.
राज ठाकरे यांनी ज्या गांधी आणि नेहरू घराण्याबद्दल बोलले, टीका केली. त्या कुटुंबीयांनी इंग्रजांची कधी माफी मागितली नाही.
तर राहुल गांधी यांनी कधी माफी मागितली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्या घराण्याविषयी बोलता त्यावेळी त्यांच्या घराण्याने देशासाठी बलिदान दिले आहे हेही तुमच्या लक्षात असू द्या असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.