Maharashtra Health Dept Exam Date Update: आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, 24 आणि 31 ऑक्टोबरला परीक्षा

आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गच क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Maharashtra Health Dept Exam Date Update: आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, 24 आणि 31 ऑक्टोबरला परीक्षा
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 6:07 PM

मुंबई: आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.  परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती  1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना  9 दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार

राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता. त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात  काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचं काही दिसत असेल तर तातडीनं तक्रार दाखल करा, असं राजेश टोपे म्हणाले.

न्यासा संस्था कुणी ठरवली?

न्यासा ही संस्था आरोग्य विभागाने ठरवली नव्हती.  सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागाने 5 एजन्सी निवडल्या आहेत.  आरोग्य विभागाचं काम हे परीक्षेचा पेपर तयार करणे हे काम होतं. पेपर प्रिटिंग, परीक्षा केंद्र निवडणं, इतर बाबी या संबंधित एजन्सीच्या असतात. आरोग्य विभागानं पेपर तयार करुन त्यांच्याकडे सोपवण्याचं काम केलंलं आहे.  या संस्थेचं अन्य विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी काम केलंलं आहे, असं सांगण्यात आलं. मात्र, प्रश्नपत्रिका  तयार करणं हेचं आमचं काम असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

ऑडिओ क्लिपचा तपास करणार

ऑडिओ क्लिप कुणी बनवली त्यात तथ्य आहे का.? अशा कुठल्याही बाबतीत पोलीस ठाण्यात तक्रार द्याव्यात ही मी विनंती करत आहे, असं राजेश टोपे म्हणाले. आम्हाला नावे कळले तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपी ला पत्र देऊन कळवलं आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.

6205 पदांसाठी परीक्षा 

दरम्यान, आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

इतर बातम्या:

maharashtra health department recruitment 2021 | आरोग्य विभागाची भरती परीक्षा पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

परीक्षार्थींना दिलासा, आता ‘या’ तारखांना आरोग्य विभागाची परीक्षा होण्याची शक्यता, राजेश टोपेंनी दिली माहिती

Rajesh Tope announced MHD exam Date 2021 for group c and group d recruitment

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.