Rajnish Seth on Raj Thackeray : राज ठाकरेंना अटक होणार का ? महाराष्ट्र सरकार करू शकते मोठी कारवाई, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
औरंगाबाद झालेल्या भाषणाच्या व्हिडीओची सायबर सेलच्या पोलिसांनी पाच तास चौकशी केली. त्याचा अहवाल डीजीपीकडे देण्यात आला आहे. सभेपुर्वी दिलेल्या नियमावलीचं राज ठाकरेंकडून उल्लंघन केलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मुंबई – औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. झालेल्या औरंगाबादच्या सभेत (Aurangabad Sabha) त्यांनी पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. चार तारखेनंतर मशिदीसमोर मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने डबल आवाजात हनुमान चाळीसा (Hanuman Chalisa)लाऊडस्पिकरवरती लावावा. असं चॅलेज राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना जाहीररीत्या दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. आता महाविकास आघाडीचे नेते त्याविरोधात का भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हालचालीवरून ते राज ठाकरेंवरती कारवाई करतील असं वाटतं आहे.
व्हिडीओची सायबर सेलच्या पोलिसांनी पाच तास चौकशी केली
औरंगाबाद झालेल्या भाषणाच्या व्हिडीओची सायबर सेलच्या पोलिसांनी पाच तास चौकशी केली. त्याचा अहवाल डीजीपीकडे देण्यात आला आहे. सभेपुर्वी दिलेल्या नियमावलीचं राज ठाकरेंकडून उल्लंघन केलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भाषणात तणाव निर्माण होईल अशी देखील वक्तव्ये केली आहेत.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस सक्षम
औरंगाबादमध्ये झालेल्या भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद सीपी सक्षम आहे. औरंगाबादचे सीपी कोणते गुन्हे लावायचे कारवाई करायचे त्याचा अभ्यास करत आहेत. कोणीही जातीय तेढ निर्माण केला तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे तसेच नोटीसा दिल्या आहेत. 87 एसआरपीएफ कंपनी 30 हजारावर होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. सर्व सीपींना सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही. आत्तापर्यंत १५ हजार लोकांवरती आत्तापर्यंत कारवाई केली आहे अशी माहिती पोलिस संचालकांनी दिली आहे.