VIDEO: चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?; राऊतांमुळे सोमय्यांच्या टार्गेवर असलेल्या चहावाल्याचं ‘टीव्ही9’ला रोखठोक उत्तर

पुण्यातील कोव्हिड सेंटरचं कंत्राट एका चहावाल्याला महाविकास आघाडीने दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. राजीव साळुंखे नावाच्या चहावाल्यावर सोमय्या यांनी हे आरोप केले होते.

VIDEO: चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?; राऊतांमुळे सोमय्यांच्या टार्गेवर असलेल्या चहावाल्याचं 'टीव्ही9'ला रोखठोक उत्तर
चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 3:17 PM

मुंबई: पुण्यातील कोव्हिड सेंटरचं (covid center) कंत्राट एका चहावाल्याला महाविकास आघाडीने दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. राजीव साळुंखे नावाच्या चहावाल्यावर सोमय्या यांनी हे आरोप केले होते. त्यानंतर हा चहावाला अचानक चर्चेत आला. सोमय्या केवळ आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी परळ येथील या चहावाल्याच्या हॉटेलात जाऊनही पाहणी केली. त्यानंतर टीव्ही9 मराठीच्या टीमने सर्वात आधी या चहावाल्याला शोधून काढले. राजीव साळुंखे (rajiv salunkhe) यांनी सर्वात आधी ‘टीव्ही 9 मराठी’ला फोनो दिला. त्यात त्यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. या देशाचा पंतप्रधान एक चहावाला होऊ शकतो. मी तर बिझनेस मन आहे. मी कोव्हिड सेंटर का चालवू शकत नाही? असा रोखठोक सवाल राजीव साळुंखे यांनी सोमय्यांना केला आहे.

काल मी किरीट सोमय्यांची बाईट पाहिली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे देणार आहे. सध्या मी वकिलासोबत बसलो आहे. सर्व उत्तरे देईन. जे आहे ते आहे. आम्ही काही चोरी केली नाही. रितसर सरकारच्या नियमानुसार आम्ही टेंडर मिळवलं आहे. त्यांना कुठून खोटी माहिती मिळाली माहीत नाही, असं राजीव साळुंखे म्हणाले.

सोमय्यांच्या जन्माआधीपासून आमचं हॉटेल

सोमय्या सारखं चहावाला चहावाला असं म्हणत आहेत. माझ्या हॉटेलला जवळजवळ 70 वर्ष झाले आहेत. तेव्हा सोमय्यांचा जन्मही झाला नसेल. सोमय्या माझ्यावर चुकीचे आरोप करत आहेत. मी सर्व डिटेल्स देईल. निश्चितपणे देणार आहे. मी मुंबईतच आहे. पण वकिलासोबत आहे. खोटेनाटे आरोप सुरू आहेत. आम्हालाही उत्तर द्यावे लागणार आहे. त्या संदर्भानच मी वकिलांना भेटलो आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे पॉलिटकल इश्यू

आमच्या न्यू लाईफ कंपनीत डॉक्टरही आहेत, त्यामुळे चहावाल्याला कंत्राट मिळालं असं कसं म्हणता. चहावाला देशाचा पंतप्रधान बनू शकतो. तर एवढी वर्ष धंदा करणारा बिझनेसमन लोकांची सेवा करण्यासाठी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का? माझ्या स्वत:च्या घरातील पाच जण कोव्हिडने गेले. यापेक्षा वेगळं दु:ख काय सांगू? हे पॉलिटिकल इश्यू आहेत. ते उगाच आम्हाला हायलाईट करत असून त्रास देत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, अजित पवारांचं किरीट सोमय्यांना उत्तर

अनिल देशमुख यांच्या डावी-उजवीकडील खोली उद्धव ठाकरेंना सॅनिटाईज करावी लागेल; किरीट सोमय्यांचा इशारा

प्रत्येक राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायत लढणार, आदित्य ठाकरेंची घोषणा; भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची खेळी?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.