Rajya Sabha Election 2022: राज्यसभेत धूळ चारल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आणखी एका बालेकिल्ल्यावर फडणवीसांची नजर, मुंबई पालिकेवर भाजपचा भगवा, विजयी सभेत घोषणा

सर्व प्रक्रिया सुरळीत चालू राहिली तर येत्या सप्टेंबर महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकते. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेत धूळ चारल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आणखी एका बालेकिल्ल्यावर फडणवीसांची नजर, मुंबई पालिकेवर भाजपचा भगवा, विजयी सभेत घोषणा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 2:36 PM

मुंबईः राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) जिंकल्यानंतर भाजपने आता मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal corporation Election) दिशेने मोर्चा वळवला आहे. शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्यासाठी आता कार्यकर्त्यांनी तयार रहावं, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज मुंबईत भाजपने विजयाची मिरवणूक काढली. या विजयी सभेला संबोधित करताना फडणवीसांनी पक्षाचे पुढील अजेंडे काय असतील, याचे सूतोवाच केले. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी वाहून न जाता हाच उत्साह पुढील निवडणुकीत कायम ठेवा, आपल्याला महापालिका, लोकसभा आणि विधानसभाही काबीज करायची आहे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुंबईमध्ये विजयी सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ आम्ही जिंकल्यानंतर अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. चेहरे पडले आहेत .काही तर पिसाटले आहेत. पण जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते. आनंद साजरा करायचा असतो. त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूयात. कुणामुळं जिंकले हे त्यांना खरच माहिती असेल तर ते काहीही करणार नाहीत. कारण त्यांचं सरकार हे टिकवणं त्यांना महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला ज्यांनी मदत केली, त्यांच्यावर कारवाई करायला मदत केली ते निघून जातील. पण जे अजून त्यांच्या जदबावाखाली आहेत, तेही निघून जातील..’असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

‘मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवायचाय’

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘ या संपूर्ण निवडणुकीनंतर सरकारनी आणि मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. येत्या काळात महापालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती. सगळीकडे आपण या सरकारला परास्त करणार आहोत. 2024 मध्ये पहिल्यांदा लोकसभा येईल. भाजपा स्वतःच्या जोरावर लोकसभेत सत्ता आणेल. त्यानंतर विधानसभेत भाजप सत्तेत येईल. उत्साह कायम ठेवा पण उत्साहात वाहून जाऊ नका. आपल्याला या महाराष्ट्रात, मुंबई महापालिकेत भाजपचा भगवा लावायचाय, त्याकरिता आपण सगळ्यांनी तयार रहावं.’

हे सुद्धा वाचा

मुंबईची निवडणूक कधी?

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यात घेतल्या जातील असे जाहिर केले आहे. या पहिल्या टप्प्यातील महानगर पालिकांच्या प्रभाग रचनेचा आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाली असून आरक्षण सोडत देखील जाहीर झाली आहे. सर्व प्रक्रिया सुरळीत चालू राहिली तर येत्या सप्टेंबर महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ शकते. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मागील सहा महिन्यांपासून भाजप विरोधात शिवसेना यांदरम्यान जे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, ते पाहता यंदाची मुंबई मनपा निवडणूक दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.