Rajyasabha Election : आली मतदानघटिका समिप, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये वऱ्हाडांची गजबज, मविआचं स्नेहभोजन ट्रायटंडला, भाजप ताजमध्ये तर काँग्रेसचे आमदार रेनिसन्सला

सहावी जागा आमचीच म्हणत शिवसेनेने या जागेसाठी सर्वात आधी उमेदवार दिला तर दुसरीकडून भाजपही गप्प बसलं नाही, लगेच भाजपनेही धनंजय महाडिकांना संजय पवारांविरोधात मैदानात उतरवलं. त्यामुळे आता फोडाफोडी रोखण्यासाठी ही पळापळ सुरू आहे.

Rajyasabha Election : आली मतदानघटिका समिप, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये वऱ्हाडांची गजबज, मविआचं स्नेहभोजन ट्रायटंडला, भाजप ताजमध्ये तर काँग्रेसचे आमदार रेनिसन्सला
आली मतदानघटिका समिप, मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये वऱ्हाडांची गजबज, मविआचं स्नेहभोजन ट्रायटंडला, भाजप ताजमध्ये तर काँग्रेसचे आमदार रेनिसन्सलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 7:50 PM

मुंबई : राज्यसभेच्या मतदानाला (Rajyasabha Election)आता अवघे काही तास उरले आहेत. या शेवटच्या तासातही मतांच्या जुळवाजुळवीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपची (BJP) पळापळ सुरू आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकांचा सपाटा लावला आहे. आपले आमदारही फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच ठेवले आहेत. त्यामुळे आता फाईव्ह स्टार हॉटेलावाल्यांनाही अच्छे दिन आले आहेत. आता मतदान घटिका जशी समिप येईल तशी बैठकांची लगबग सध्या सुरू आहे. विजयाचा दावाही दोन्ही बाजुने करण्यात येत आहे. राज्यसभेला सहा जागांसाठी सात उमेदवार झाल्याने हा सगळा खटाटोप सुरू आहे. सहावी जागा आमचीच म्हणत शिवसेनेने या जागेसाठी सर्वात आधी उमेदवार दिला तर दुसरीकडून भाजपही गप्प बसलं नाही, लगेच भाजपनेही धनंजय महाडिकांना संजय पवारांविरोधात मैदानात उतरवलं. त्यामुळे आता फोडाफोडी रोखण्यासाठी ही पळापळ सुरू आहे.

भाजपचे आमदार ताजमध्ये…

भाजपने आपल्या सर्व आमदारांची आणि पाठिंबा देणाऱ्या आमदारांची बैठक ही मुंबईतला ताज हॉटेलमध्ये घेतली आहे. या बैठकीला पाच दिवसात कोरोनापासून मुक्ती मिळवणारे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही पोहोचले होते. यावेळी भाजपने विजयाचा संकल्प करत महाविकास आघाडीविरोधात रणशिंग फुंकलं आहे. मात्र तिकडे महाविकास आघाडीला अपक्षांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपला खरा अंदाज लागणं कठीण झालंय.

शिवसेनेचे आमदार ट्रायडंट मुक्कामी

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने आपले सर्व आमदार तसेच पाठिंबा असणारे अपक्ष आमदार हे ट्रायडंट मुक्कामी ठेवले आहेत. मात्र या ठिकाणी भाजपकडून घुसण्याचा प्रयत्न होत असल्याने आता याठिकाणी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत खुद्द दाखल झाले आहेत. एवढेचं नाही तर ते आज रात्री ट्रायडंमध्येच आमदरांसोबत मुक्कामही करणार आहेत. कारण सेनेनेही कुठल्याही परिस्थिती संजय पवार यांचा विजय खेचून आणण्याचा विडाच उचलला आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने स्नेहभोजनही ठेवलं आहे.

राष्ट्रवादीचे आमदार ब्लू सीमध्ये…

तर तिकडे राष्ट्रवादीनेही आपले आमदार सुरक्षित ठिकाणी…म्हणजेच हॉटेल ब्लू सीला मुक्कामी ठेवले आहेत. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदावरी देण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांची जागा जरी आरामात निवडून येत असली तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादीची धडपड सुरू आहे.

काँग्रेसचे आमदारही रेनिसन्समध्ये…

आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून एवढा खटाटोप झाल्यावर काँग्रेस कसं मागे राहिलं? काँग्रेसनेही सभाव्य फुटाफुटीचा धोका ओळखून वेळीच आपले आमदार रेनिसन्स हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. आमच्या चारही जागा निवडून येतील असे महाविकास आघाडीचे नेते हे फुल्ल कॉन्फिडन्सने सांगत आहे. तर भाजपनेही आपल्या विजयाचा दावा कामय ठेवला आहे. मात्र आता घोडं मैदान लांब नाही, गुलाल कुणाचा आणि कुणाचा बार फुसका निघणार हे चित्रही लवकच स्पष्ट होईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.