Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyasabha Election : राज्यसभेची निवडणूक मविआसाठी कागदोपत्री सोपी?, महाविकास आघाडीचं छोटे पक्ष-अपक्षांसह संख्याबळ 165?, चार उमेदवार निवडून येणे शक्य?

सध्याच्या महाविकास आघाडीच्या गणिताचा विचार केला तर चारही उमेदवार निडणून येण्याइतपत संख्याबळ मविआकडे आहे, असे कागदोपत्री तरी दिसते आहे. प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी 40.5 चा म्हणजेच 41 आमदारांचा आकडा आवश्यक आहे.

Rajyasabha Election : राज्यसभेची निवडणूक मविआसाठी कागदोपत्री सोपी?, महाविकास आघाडीचं छोटे पक्ष-अपक्षांसह संख्याबळ 165?, चार उमेदवार निवडून येणे शक्य?
राज्यसभेची निवडणूक मविआसाठी कागदोपत्री सोपी?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 11:29 PM

मुंबईराज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election)जशी अखेरच्या टप्प्यात येत आहे तशी आणकी वाळणं घेतना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi)विजय सोपा दिसतो आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या गणिताचा विचार केला तर चारही उमेदवार निडणून येण्याइतपत संख्याबळ मविआकडे आहे, असे कागदोपत्री तरी दिसते आहे. प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी 40.5 चा म्हणजेच 41 आमदारांचा आकडा आवश्यक आहे. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. तर राषट्रवादीचे 54 संख्याबळ आहे. त्यातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार (Voting) मिळाला नाही तरी त्यांचे संख्याबळ 52 असेल. काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. या तिन्ही पक्षांच्या आमदारांची बेरीज होते 151, त्यासह 12 छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते त्यांची नावे पुढीलप्रमाणे …

  1. शंकरराव गडाख
  2. राजेंद्र पाटील येड्रावकर
  3. मंजुळा गावित
  4. गीता जैन
  5. आशिष जयस्वाल
  6. किशोर जोरगेवार
  7. चंद्रकांत पाटील
  8. विनोद अगरवाल,गोंदिया
  9. बच्चू कडू
  10. राजकुमार पटेल
  11. नरेंद्र बोंडेकर
  12. विनोद निकोले, माकप

इतरांचा पाठिंबा कुणाला मिळणार?

ही एकूण संख्या 163 आहे, यात सपाच्या दोन आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात मविआला यश आले आहे. म्हणजे हा एकूण आकडा 165 पर्यंत जातो आहे. त्यातही रात्री उशिरा एमआयएमसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. ते सकारात्मक दिसतायेत. त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. ते सकराळी 9 वाजता भूमिका स्पष्ट करणार आहेत. ही संख्या जोडली तर हा आकडा 167 पर्यंत जाईल. तसचे बहुजन विकास आघाडीचे हिंतेंद्र ठाकूर हेही उद्याच भूमिका स्पष्ट करणार आहेत, त्यांच्याकडे 3 आमदार आहेत. त्यांनी पाठिंबा दिला तर मविआकडे 170 चे संख्याबळ असेल. अगदी एमआयएम आणिबवआने पाठिंबा दिला नाही, तरी मविआचे चारही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. आता यात भाजपा शेवटच्या मिनिटाला काय पत्ते फिरवणार, त्यात त्यांना यश मिळणार का, याकडे उद्याच्या मतदानावेळी काय घडेल, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

रात्रीत चक्र फिरवण्याचा प्रयत्न होणार?

काही निवडणुका अशा असतात की त्यांचं चित्र आधी कितीही स्पष्ट दिसत असलं तरी निकाल लागेपर्यंत काही सांगता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीने राज्यातलं राजकारण हे ढवळून काढलं आहे. आता मतदानाला अवघे काही तास उरले असतानाचे अंदाजही वेगवेगळे आहेत. त्यामुळे कुणाचा विजय आणि कुणाची निराशा होणार हे पाहण्यासाठी जास्त वाट बघावी लागणार नाही.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.