मुंबई – राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election)जशी अखेरच्या टप्प्यात येत आहे तशी आणकी वाळणं घेतना दिसत आहे. राज्यसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi)विजय सोपा दिसतो आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या गणिताचा विचार केला तर चारही उमेदवार निडणून येण्याइतपत संख्याबळ मविआकडे आहे, असे कागदोपत्री तरी दिसते आहे. प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी 40.5 चा म्हणजेच 41 आमदारांचा आकडा आवश्यक आहे. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. तर राषट्रवादीचे 54 संख्याबळ आहे. त्यातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार (Voting) मिळाला नाही तरी त्यांचे संख्याबळ 52 असेल. काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. या तिन्ही पक्षांच्या आमदारांची बेरीज होते 151, त्यासह 12 छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते त्यांची नावे पुढीलप्रमाणे …
ही एकूण संख्या 163 आहे, यात सपाच्या दोन आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात मविआला यश आले आहे. म्हणजे हा एकूण आकडा 165 पर्यंत जातो आहे. त्यातही रात्री उशिरा एमआयएमसोबत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. ते सकारात्मक दिसतायेत. त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. ते सकराळी 9 वाजता भूमिका स्पष्ट करणार आहेत. ही संख्या जोडली तर हा आकडा 167 पर्यंत जाईल. तसचे बहुजन विकास आघाडीचे हिंतेंद्र ठाकूर हेही उद्याच भूमिका स्पष्ट करणार आहेत, त्यांच्याकडे 3 आमदार आहेत. त्यांनी पाठिंबा दिला तर मविआकडे 170 चे संख्याबळ असेल. अगदी एमआयएम आणिबवआने पाठिंबा दिला नाही, तरी मविआचे चारही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. आता यात भाजपा शेवटच्या मिनिटाला काय पत्ते फिरवणार, त्यात त्यांना यश मिळणार का, याकडे उद्याच्या मतदानावेळी काय घडेल, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
काही निवडणुका अशा असतात की त्यांचं चित्र आधी कितीही स्पष्ट दिसत असलं तरी निकाल लागेपर्यंत काही सांगता येत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीने राज्यातलं राजकारण हे ढवळून काढलं आहे. आता मतदानाला अवघे काही तास उरले असतानाचे अंदाजही वेगवेगळे आहेत. त्यामुळे कुणाचा विजय आणि कुणाची निराशा होणार हे पाहण्यासाठी जास्त वाट बघावी लागणार नाही.