Rajyasabha Election : आमदारांना ट्रेन करण्यासाठी आणखी बैठका होणार, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तांत्रिक बाबी…
कुणाला पहिलं प्रधान्य द्यायचं, याबाबत कवायतीही होतील, कुणीही यातंल बाहेर जाणार नाही. विश्वास प्रस्ताव पास झाला तेव्हा आमच्याकडे 170 आमदार होते. त्यात आणखी वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पृथ्वीराज चव्हाण (Congress) यांनी दिली आहे.
मुंबई : आज मुंबईत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आज राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विधीमंडळातील सर्व नेते नेत्यांची बैठक पार (Mahavikas Aghadi Meeting)पडली आहे. यात विधानसभेचे महाविकास आघाडीचे सर्व सदस्य होते. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी खरगे साहेब, मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) आणि पवार होते, या तिघांचं मार्गदर्शन झालं. आम्हाला विश्वास आहे, आमच्याकडे संख्याबळ आहेत, आमचा विजय निश्चित होणार यात शंका नाही. मात्र ही निवडणूक ही 24 वर्षांनी होत आहे. त्यामुळे मतदान कसं करायचं, याबाबत मी आणखी एकदोन बैठका घेणार आहे. कुणाला पहिलं प्रधान्य द्यायचं, याबाबत कवायतीही होतील, कुणीही यातंल बाहेर जाणार नाही. विश्वास प्रस्ताव पास झाला तेव्हा आमच्याकडे 170 आमदार होते. त्यात आणखी वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पृथ्वीराज चव्हाण (Congress) यांनी दिली आहे. तर या बैठकीत कोणत्याही तांत्रिक बाबी सांगितल्या नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अभिजीत वंजारी यांनी दिली होती.
मुख्यमंत्री म्हणतात उत्सवाची तयारी सुरू करा
तर उत्सवाची तयारी करा, आमचे चारही उमेदवार निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही चिंता नाही, अशी प्रतिकिया यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच या बैठकीआधीही आम्हाला भेदरले बोलता तर तुमची तिकडे ताज मध्ये बाहदरली आहे का? असा सवालही राऊतांनी भाजपला केला होता.
आच्या चारही जागा निवडून येणार
तर महाविकास आघाडीचे चारही खासदार दिल्लीत जाणार आहेत, आतील संबोधन सांगण्यासारखं नाही, मात्र विरोधकांनी कितीही प्रयत्न करूद्या काही फायदा होणार नाही. गेल्यावेळची राज्यसभेची निवडणूक आता आपल्याला आठवावी लागते. आपण एक परंपरा पाळत आलो आहोत. सभ्यता आणि राजकारण या गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी थोडीफार सभ्यता पाळायला हरतक नव्हती, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
राजेश टोपे काय म्हणाले?
तर मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी काय मार्गदर्शन केलं असे विचारले असता, त्यांनी एकीचे आव्हान केलं आहे. मला वाटतं आमदार त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील. समान किमान कार्यक्रमावर आणखी भर दिला जाईल. चारही जागा आपल्याच निवडून येतील आणि एकत्रित बसून प्रश्न सोडवता येतील, अशी प्रतिक्रिया यावेळी राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर अनेक मोठ्या घडामोडींनी वेग आला आहे.