Rajyasabha Election : संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार? ससपेन्स कायम, सोमवारी निर्णयाची शक्यता, निलेश राणे म्हणतात…

तरीही शिवसेना ही जागा लढवण्यावर ठाम राहिली. तसेच राजेही अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यातच राजेंना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण देत शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने भेट घेत ऑफर दिली. तसेच उद्या हाती शिवबंधन बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निरोपही पोहोचवला.

Rajyasabha Election : संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करणार? ससपेन्स कायम, सोमवारी निर्णयाची शक्यता, निलेश राणे म्हणतात...
संभाजीराजेंच्या राज्यसभा खासदारकीचा सस्पेन्स कायम!Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 11:37 PM

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीचं (Rajyasabha Eleciton) संपूर्ण राजकारण सध्या सहाव्या जागेभोवती फिरू लागलं आहे. कारण संभाजीराजेंच्या खासदारकीबद्दल (Sambhaji Chhatrapati ) अजूनही सस्पेन्स कायम आहे. सुरूवातील संभाजीराजेंनी या जागेवरून अपक्ष लढण्याची हाक दिली. त्यानंतर संभाजीराजेंना शिवसेनेकडून लढण्याची हाक दिली. मात्र संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत म्हणून पाठिंबा द्या अशी मागणी केली. तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना शिवसेनेत येण्याची अट घातल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. पाठिंब्यासाठी संभाजीराजेंनी दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची (Cm Uddhav Thackeray) भेट घेतली तरीही सस्पेन्स संपला नाही. कारण तरीही शिवसेना ही जागा लढवण्यावर ठाम राहिली. तसेच राजेही अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यातच राजेंना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण देत शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने भेट घेत ऑफर दिली. तसेच उद्या हाती शिवबंधन बांधण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निरोपही पोहोचवला.

राजे सेनेची ऑफर स्वीकारणार?

संभाजीराजे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्याही आल्या. तर संभाजीराजे अजूनही अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर राजेंनी ऑफर न स्वीकरल्यास शिवसेनेचा बी प्लॅन तयार असल्याच्या बातम्याही आल्या. शिवसेना दुसरा उमेदवार देण्यासाठी तयार असल्याचेही सांगण्यात आले. आता शिवेसनेच्या ऑफरनुसार संभाजीराजे उद्या शिवसेनेत दाखल होत हाती शिवबंधन बांधणार का? हा सस्पेन्स सोमवारी संपण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

निलेश राणे यांचं ट्विट

निलेश राणेंचं राजेंना आवाहन

यात वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतलेल्या भाजपने सध्या अपक्ष लढण्याची अट संभाजीराजेंना घातल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर दुसरीकेड रात्रभर विचार करा, असे म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी संभाजीराजेंना आवाहन करणारे ट्विट केले आहे. निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये लिहितात, “कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चा ला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला.” असे ट्विट राणे यांनी केले आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? हा अंदाज कुणालाच लागत नाहीये.

बंजारा समाजाच्या एन्ट्रीने नवं ट्विस्ट

यात फक्त राजेच नाही तर आता या शर्यतीत बंजारा समाजही उतरला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपली वर्णी लावून बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्या अशी मागणी महंत सुनील महाराज यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे. तसेच त्यांनी दोन पर्याय दिले आहेत, अशीही माहिती मिळाली आहे. सुनील महंत यांची राज्यसभेवर वर्णी लावा किंवा संजय राठोड यांचे मंत्री मंडळात पुनर्वसन करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवली आहे. त्यामुळे सेनेपुढेही आता नवा पेच तयार झाला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.