लतादीदी, तेंडुलकर, सुनील शेट्टीची चौकशी नको, आधी ‘त्या’ सेलिब्रिटींना धरा, राम कदमांचं गृहमंत्र्यांना पत्र
शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते (Ram Kadam Anil Deshmukh Bharatratna)
मुंबई : ‘भारतरत्नां’च्या चौकशीचे आदेश मागे घ्यावेत, त्याऐवजी सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून राम कदमांनी काँग्रेसची भाषा बोलणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Ram Kadam writes to Anil Deshmukh asks not to enquire Bharatratna Lata Mangeshkar Sachin Tendulkar)
भाजप आमदार राम कदम यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहित भारतरत्नने सन्मानित गानकोकीळा लता मंगेशकर आणि विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, तसेच अभिनेता अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांच्या ट्विटची चौकशी रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसची भाषा बोलणारे सेलिब्रिटीची सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा, हृतिक रोशन, स्वरा भास्कर, अली फजल, रवीश कुमार, हार्दिक पटेल अशा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींत्या ट्विटची चौकशी करण्याची मागणी राम कदमांनी केली.
#काँग्रेसच्या भाषेमध्ये परदेशी षडयंत्रकारीचे समर्थन ट्वीट करणाऱ्या सेलिब्रिटीची चौकशी कधी करणार?आणि भारत रत्नांच्या @mangeshkarlata @sachin_rt @akshaykumar @SunielVShetty यांच्या चौकशीचे आदेश मागे घ्यावे @AnilDeshmukhNCP@OfficeofUT#IndiaAgainstPropoganda #IndiaStandsTogether pic.twitter.com/xy0c2wwjb3
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) February 9, 2021
अनिल देशमुखांचा निर्णय काय?
पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, असं सचिन सावंत यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीसांकडूनही टीकास्त्र
राज्य सरकारचा सेलिब्रेटीच्या ट्विट करण्या निर्णय हा संतापजनक ? असून कुठे गेला मराठीबाणा? कुठे गेला महाराष्ट्रधर्म? अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे. भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत, निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे, असा संताप देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Ram Kadam writes to Anil Deshmukh asks not to enquire Bharatratna Lata Mangeshkar Sachin Tendulkar)
शेलारांचा निशाणा
भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील सेलिब्रेटीजच्या ट्विट करण्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. “आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले”., असं आशिष शेलार म्हणाले.
“कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर”, आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!” अशा शब्दात आशिष शेलारांनी राज्य सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.
भातखळकर कडाडले
देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ अतुल भातखळकर यांनी देखील अनिल देशमुखांच्या निर्णयावर टीका केली आहे. “अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे.देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते.”, असं वक्तव्य अतुल भातखळकरांनी केलं आहे.
संबंधित बातम्या:
सेलिब्रिटीजच्या ‘त्या’ ट्विटची चौकशी होणार; अनिल देशमुखांचे आदेश
“भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत”, देवेंद्र फडणवीसांसंह भाजप आक्रमक
(Ram Kadam writes to Anil Deshmukh asks not to enquire Bharatratna Lata Mangeshkar Sachin Tendulkar)