60 ग्रामपंचायतींवर आरपीआयच्या नेतृत्वात विजय तर 3 हजार उमेदवार विजयी, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दावा
राज्यात 60 ग्राम पंचायती रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात जिंकण्यात आल्या अहेत, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केला. (Ramdas Athawale)
मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना गावच्या विकासासाठी आवाहन केले आहे. निवडणुकीत झालेले वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करावे,असे आवाहन आठवले यांनी केले आहे. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे. असून 2 हजार 960 पेक्षा अधिक सदस्य रिपाइंचे निवडून आले आहेत, असं देखील रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale appeal to elected members of Gram Panchayat came together for development of Village)
राज्यात भजप आणि आरपीआयला ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत मिळालं आहे. राज्यातील जनतेचा भाजपवर विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे, असा दावा रामदास आठवले यांनी केला.
रामदास आठवलेंचे ट्विट
राज्यात झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अंदाजे 3 हजार सदस्य निवडुन आले आहेत. तसेच राज्यात 60 ग्राम पंचायती रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात जिंकण्यात आल्या अहेत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) January 19, 2021
60 ग्रामपंचायतींवर आरपीयची सत्ता: राजाभाऊ सरवदे
राज्यात 12 हजार 711 ग्राम पंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा अंदाजे 60 ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकला आहे. संपूर्ण राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 3 हजार सदस्य निवडून आले आहेत, अशी माहिती रिपाइंचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. अक्कलकोट तालुक्यातील बग्गेहळ्ळी गावात रिपाइंने भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी अशा सर्व पक्षांना दणका देत स्वबळावर सर्व उमेदवार निवडून आणून ग्राम पंचायतीवर निळा झेंडा फडकविला असल्याची माहिती राजभाऊ सरवदे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात रिपब्लिकन पक्षाची जनतेशी नाळ घट्ट आहे. अनेक ठिकाणी स्वबळावर तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजपशी युती करून रिपाइंने ग्रामपंचायत निवडणूक लढविली आहे. त्यात रिपाइंचे 3 हजारांहून अधिक सदस्य निवडून आल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.
संबंधित बातम्या:
मग मी मंत्रालयात कसा येऊ? रामदास आठवलेंचा राज्य सरकारला सवाल!
रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाची ‘या’ राज्यातही एन्ट्री, 10 जागांवर लढणार
(Ramdas Athawale appeal to elected members of Gram Panchayat came together for development of Village)