‘अशोक चव्हाण यांनी आरपीआयमध्ये प्रवेश करावा’; रामदास आठवलेंनी चव्हाणांना खुली ऑफर
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याच्या घेतलेल्या निर्णयाची राज्यभर चर्चा होत असलेली पाहायाला मिळत आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
मुंबई | काँग्रेस पक्षासाठी निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे. काँग्रेच पक्षातील ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेसच्या प्राथामिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत आहे. अशातचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
रामदास आठवले काय म्हणाले?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला हा त्यांनी चांगला निर्णय घेतला.मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. अशोक चव्हाण यांनी महायुतीमध्ये यावे. तसेच महायुती मधील माझ्या रिपब्लिकन पक्षात त्यांनी प्रवेश करावा असे मी त्यांना आवाहन करतो, असं आठवले म्हणाले. आठवले यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का?
अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यावर माध्यमांसमोर येत, मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मला कुणाबद्दल तक्रार करायची नाही. माझ्या मनात कुणाहीबद्दल वैयक्तिगत भावना नाही. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रमाणिकपणे काम केलं आहे. यापुढची राजकीय दिशा, मी एक-दोन दिवसात निर्णय घेईन. मी अद्याप ठरवलेलं नाही. दोन दिवसात मी माझी राजकीय भूमिका काय असेल ते ठरवेल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.