Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: वैभव खेडेकर काय तुमचे जावई आहेत का?; रामदास कदम यांचा आपल्याच सरकारला थेट सवाल

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना निलंबित करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज आपल्याच सरकारला घेरलं.

VIDEO: वैभव खेडेकर काय तुमचे जावई आहेत का?; रामदास कदम यांचा आपल्याच सरकारला थेट सवाल
ramdas kadam
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:33 PM

मुंबई: खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना निलंबित करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज आपल्याच सरकारला घेरलं. वैभव खेडेकरांना अपात्र करण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला असताना त्यांना अपात्र का केलं जात नाही? असा सवाल करतानाच खेडेकर काय तुमचे जावई आहेत का? असा सवाल रामदास कदम यांनी थेट आपल्याच सरकारला केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या नगरविकास खात्यावरच हल्ला चढवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रामदास कदम यांनी आज विधान परिषदेत मनसेचे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडतानाच या प्रकरणाकडे कानाडोळा करणाऱ्या ठाकरे सरकारवरही हल्लाबोल केला. नगराध्यक्ष खेडेकर यांनी नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचार केले. 20 प्रस्ताव केले. त्यांना अपात्र करण्यासाठी 50 टक्के नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. 20 पैकी 11 मुद्द्यात ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने 15 दिवसात त्यांना अपात्र केलं पाहिजे. पण दोन महिने झाले प्रस्ताव राखून ठेवला. त्यांना अपात्र केलं जात नाही. 11 मुद्द्यावर भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं आहे. त्यांना पाठिशी का घालता? ते तुमचे जावई आहेत का? असा सवाल कदम यांनी केला. त्यानंतर मीडियाशी बोलताना कदम यांनी खेडेकरांवरील तीन गंभीर आरोपांवर भाष्य केलं.

कदमांचे तीन गंभीर आरोप

>> मनसेचे नगराध्यक्ष आहेत. ते राष्ट्रवादीसोबत असतात. खेडमध्ये भडगाव आहे. तिथे बौद्धवाडी असल्याचं दाखवून समाजकल्याणचा 20 लाखांचा निधी आणून नाल्यावर पूल बांधला. बौद्धवाडीच्या नावाने खासगी बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी हा पूल बांधला. त्या इमारतीत त्याच्या पत्नीच्या नावाने वैभवी वैभव खेडेकर या नावाने चार फ्लॅट आहेत. माझ्याकडे कागदपत्रं आहेत. या संबंधात मी अनेक तक्रारी केल्या. सार्वजनिक बांधकामापासून सामाजिक न्याय विभागापर्यंत तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली. या पुलाचा बौद्धवाडीसाठी उपयोग होत नाही असं ग्रामपंचायतीने लिहून दिलं. तसा ठरावच ग्रामपंचायतीने केला आहे. तिथे बौद्धवाडी नसल्याचं पंचायतीने सांगितलं आहे. सभापती आणि बीडीओने या प्रकरणाची चौकशी केली. प्रांतअधिकारीही घटनास्थळी येऊन गेले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने समाजकल्याणला अहवाल पाठवला. शासनाची फसवणूक करून 20 लाख वापरल्याचं सांगून या प्रकरणी कारवाई करा असं जिल्हाधिकाऱ्याने म्हटलं. एक महिना झाला पण कारवाई झाली नाही.

>> खेड नगरपालिका क वर्ग पालिकेत येते. नगराध्यक्षांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक खर्च असल्यामुळे नियमाने त्यांना एकही लिटर डिझेलही वापरता येत नाही. पण खेडेकरांनी स्वत:च्या गाडीसाठी साडेतीन लाख रुपये डिझेलसाठी वापरले. खासगी गाड्यांसाठी 23 लाख रुपयांचे डिझेल वापरले. काही गाड्यांचे नंबर नाहीत. बंद गाड्याच्या नावाने डिझेल वापरले. हा भ्रष्टाचार होत असल्याने मी नगरविकास खात्याकडे तक्रार केली. नगरविकास खात्याने चौकशी केली. त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितला. पण दोन महिने झाले गुन्हा दाखल होत नाही.

>> नगराध्यक्ष खेडेकर यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली. त्यानंतर 50 टक्क्यांपेक्षा अधिक नगरसेवकांनी त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांची सुनावणी घेतली. त्याचा अहवालही पाठवला. 11 प्रकरणात त्यांनी खेडेकरांना दोषी ठरवलं. सभागृहाचे ठराव बदलणं, कंत्राटदारांच्या बिलावर एकट्यानेच सही करणं असे अनेक मुद्दे आहेत, या प्रकरणी त्यांना दोषी ठरवलं आहे. पण नगरविकास खात्याने हे प्रस्ताव दाबून ठेवले आहेत. त्यांना अपात्रं केलं जात नाही. कारवाई केली जात नाही. नगरविकास खातं आमचं आहे. पण गंमत म्हणजे त्यांना अपात्र करणं राहिलं बाजूला त्यांना संरक्षण दिलं जात आहे. म्हणून सर्व मुद्दे सभागृहात मांडले.

संबंधित बातम्या:

VIDEO: वैभव खेडेकरांना निलंबित करा, अन्यथा कोर्टात जाईल; रामदास कदम यांचा आघाडी सरकारला घरचा आहेर

रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून आधी अडवलं, नंतर सोडलं; फोनाफोनी कामी आली?

अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी; नवा अध्यक्ष कोण? राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं

देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस.
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.