Video: डिकीमध्ये लपून राणा दाम्पत्य बाहेर जाण्याचा शिवसैनिकांना डाऊट! खारमध्ये गाड्यांची कसून तपासणी

Rana vs Thackeray Matoshree Politics : रात्रीपासून खारबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिलाय. सकाळी घोषणाबाजीही करण्यात आली.

Video: डिकीमध्ये लपून राणा दाम्पत्य बाहेर जाण्याचा शिवसैनिकांना डाऊट! खारमध्ये गाड्यांची कसून तपासणी
शिवसैनिकांचा तगडा बंदोबस्तImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 8:27 AM

मुंबई : मुंबईत राणा विरुद्ध ठाकरे (Rana vs Thackeray) असा संघर्ष शुक्रवार पाहायला मिळाला. मातोश्रीबाहेर (Matoshree) जाण्यासाठी राणा दाम्पत्यानं गनिमी कावा केला तर काय, यासाठी आधीच शिवसैनिक रात्रीपासूनच सज्ज झाले. रात्रीपासून खारबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिलाय. सकाळी घोषणाबाजीही करण्यात आली. पोलीस बंदोबस्तही (Police Security) केला गेला. दरम्यान, खार येथील प्रत्येक गाडी शिवसैनिकांकडून तपासली जाते आहे. शिवसैनिकांना राणा दाम्पत्य हे गाडीच्या डिकीमधून लपून बाहेर जाण्याचा संशय होता. त्यामुळे खार येथील राणांच्या घराबाहेरुन जाणाऱ्या प्रत्येक गाडीची डिकी महिला शिवसैनिकांनी तपासल्या आहेत. पोलिसांनी बॅरिकॅटिंगकरुन आधी तगडा पोलीस बंदोबस्त खारमध्ये ठेवलाय. दरम्यान, त्याआधी रात्रभर शिवसैनिकांनी पहारा दिलाय. त्यानंतर शनिवारी सकाळपासून वातावरण तापायला सुरुवात झाली.

दुसरीकडे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांसमोरची आव्हानंही वाढली आहेत. सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान पठन करण्याचा इशारा राणा दाम्पत्यानं दिला होता. त्यासाठी राणा दाम्पत्य हे शुक्रवारी अमरावतीवरुन मुंबईत दाखल झाले होते.

शिवसैनिकांची जोरदार फिल्डिंग

दरम्यान, शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानाला पूर्णपणे घेराव घातला आहे. खारमधील राणा ज्या ठिकाणी थांबले आहेत, त्या इमारतीला समोरुन आणि पाठीमागून दोन्हीकडून घेराव घातलाय. राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर कोणत्याही परिस्थिती मातोश्रीवर पोहोचू नये, यासाठी शिवसैनिकांनी वेढा दिला आहे.

मातोश्रीला छावणीचं स्वरुप!

एकीकडे खारमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मातोश्रीलाही छावणीचं स्वरुप आलं आहे. मोठ्या प्रमाणात बॅरिकेटींग करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

काय आहे इशारा?

मातोश्रीबाहेर जाऊन हनुपान पठण करु, असा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य हे शुक्रवारी मुंबईत दाखल झालं. शुक्रवारपासूनच नाट्यमय घडामोडी मातोश्रीबाहेर घडल्यात. संध्याकाळी मोहित कंबोज यांच्या गाडीवर कलानगर सिग्नलवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर भाजपनं या हल्ल्यावरुन शिवसेनेवर सडकून टीका केली होती. तर दुसरीकडे शुक्रवार रात्रीपासून शिवसैनिकांनी खार आणि मातोश्रीबाहेर खडापाहारा दिल्याचं चित्र पाहायला मिळालंय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.