Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी बनावट अहवाल प्रकरण, अमरावतीच्या 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द : आरोग्यमंत्री

अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्हात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात (Recognition Of 11 Laboratories In Amravati Cancelled) कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत.

रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी बनावट अहवाल प्रकरण, अमरावतीच्या 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द : आरोग्यमंत्री
आरोग्य विभागातील भरतीबाबत राजेश टोपेंचे मोठे विधान
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 12:10 PM

मुंबई : अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्हात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात (Recognition Of 11 Laboratories In Amravati Cancelled) कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. अमरावती जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तपासणीमध्ये तफावत आढळून आली आहे. काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळीच माहिती नोंदवत नसल्याचे आणि त्यांनी दिलेले काही रिपोर्ट हे बनावट असल्याचे लक्षात आल्याने, अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली (Rapid Antigen Test Fake Report Case Recognition Of 11 Laboratories In Amravati Cancelled By Government).

आरोग्यमंत्री म्हणाले, “कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर तसेच रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट या चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांपैकी आरटीपीसीआर ही गोल्ड स्टँडर्ड चाचणी मानण्यात येते. कारण या आरटीपीसीआर चाचणीने 60 ते 65 टक्के अचूक निदान होते. तर रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट चाचणीद्वारे 30 ते 35 टक्के इतके अचूक निदान होते.”

प्रयोशाळेतील इतर कोणत्याही चाचण्यांप्रमाणे या चाचण्यांसही काही मर्यादा आहेत. लक्षण विरहीत व्यक्तींमध्ये संसर्गाच्या प्रमाणात कमी कालावधीत वेगवेगळा निकाल दाखविण्याची शक्यता आहे. याशिवाय खालील कारणांमुळेही तफावत येऊ शकते.

दोन वेगवेगळ्या कालावधीत घेण्यात आलेले नमुन्यांमध्ये (सॅम्पल) विषाणूंची संख्या अत्यल्प असल्याने चाचणीच्या निदानात तफावत येण्याची शक्यता असते. काही वेळा एखादा नमुना इतर कारणांमुळे देखील दूषित (contaminate) झाल्यास, निदानात नमुना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते.

तपासणीसाठी नमुना (स्वैब) घेतल्यानंतर शीत साखळीचा अवलंब व्यवस्थितरीत्या न करता नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत गेला तर विपरीत निदान होण्याची शक्यता असते. तसेच, संबंधित प्रयोगशाळा वापरत असलेल्या टेस्ट किट्सची संवेदनशिलता/अचूकता यावरही निदानाची अचूकता अवलंबून असते.

कोव्हिड-19 साथरोगाच्या सुरुवातीच्या कालावधीत राज्यात एनआयए, पुणे ही एकमेव प्रयोगशाळा कोव्हिड-19 निदानासाठी कार्यरत होती. तथापि, आता आयसीएमआर आणि एनएबीएल मानकानुसार पात्र असलेल्या प्रयोगशाळांना आयसीएमआरकडून मान्यता देण्यात येते. आज राज्यात 376 शासकीय आणि 141 खाजगी अशा एकूण 517 प्रयोगशाळाना आयसीएमआरने मान्यता दिलेली आहे.

शासनाकडून कोव्हिड-19 निदानाचे काम करण्यात येते. या प्रयोगशाळांपैकी 98 शासकीय आणि 120 खाजगी अशा एकूण 218 प्रयोगशाळांकडून कोव्हिड-19 च्या निदानासाठी आरटीपीसीआर चाचणी पध्दतीचा अवलंब केला जातो. या प्रयोगशाळांचे काम योग्यरीत्या होण्यासाठी गुणवत्ता आणि तपासणीसाठी आयसीएमआरने कस्तूरबा संसर्गजन्य रुग्णालयातील मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई व एनआयव्ही, पुणे या दोन प्रयोगशाळांना मार्गदर्शनासाठी मेन्टॉर म्हणून निवडण्यात आलेले आहे.

Rapid Antigen Test Fake Report Case Recognition Of 11 Laboratories In Amravati Cancelled By Government

संबंधित बातम्या :

होळीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; अन्यथा गावात एन्ट्री नाही

आधी देशात नाव कमवा मग परदेशाचं बघा; कोरोना लसींच्या निर्यातीवरुन न्यायालयाच्या मोदी सरकारला कानपिचक्या

Panvel Corona | कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण, पनवेलची सद्यस्थिती काय?

हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.