टाटायन…; रतन टाटांच्या ‘त्या’ एका विचाराने मरगळलेल्या टाटा उद्योगाला नवी उभारी

Ratan Tata Contribution in Tata Group Grown Up : भारताचं नाव जगभरात उंचावणारे उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने उद्योग विश्वासह देशभरातून आणि जगभरातून संवेदना व्यक्त केली जात आहे. टाटा उद्योग समुहा विस्तारण्यात रतन टाटा यांचं मोठं योगदान राहिलं आहे.

टाटायन...; रतन टाटांच्या 'त्या' एका विचाराने मरगळलेल्या टाटा उद्योगाला नवी उभारी
रतन टाटाImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 10, 2024 | 8:15 AM

रतन टाटा… ज्यांचं नाव घेतल्याशिवाय भारताचं उद्योग वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. नसरवानजी टाटा यांनी उभारलेल्या, जमशेदजी टाटा यांनी वाढवलेल्या टाटा उद्योग समुहाना विस्तारण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा राहिला आहे. आज एकही अशी वस्तू नाही जी टाटा ग्रुप तयार करत नाही. पिढ्यान् पिढ्याच्या व्यवसायाला रतन टाटा यांनी नवी उभारी दिली ती जे. आर. डी. यांच्या विचाराने आणि आधुनिकतेच्या वाटेने… रतन टाटा जेव्हा टाटा उद्योग समुहात आले तेव्हा त्यांच्या एका विचाराने मरगळलेल्या व्यवसायाला त्यांनी नवी उभारी दिली.

रतन टाटांची एन्ट्री

टाटा समुहाचा ‘नेल्को’ अंतर्गत हा रेडिओची निर्मिती करत होता. एकेकाळी नेल्कोचं मार्केट शेअर 20 % होतं. जे 2 टक्क्यांवर येऊन ठेपलं. टाटा समुहामध्ये मरगळ निर्माण झाली होती. अशावेळी जमशेदजी टाटा यांच्या नातवाला ‘नेल्को’ला पुन्हा रूळावर आणण्यासाठी बोलावण्यात आलं. जमशेदजी टाटा यांचा हा नातू म्हणजेच रतन टाटा… तसं तर 1962 पासूनच रतन टाटा हे फॅमिली बिझनेसवर काम करू लागले. पण 1071 ला अधिकृतरित्या रतन टाटा यांना काम करायला सुरुवात केली अन् सुरु झाला प्रवास ‘टाटायन’चा…

‘त्या’ एका विचाराने टाटा उद्योगाला नवी उभारी

1971 टाटा ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह होताच रतन टाटा यांनी मोठा निर्णय घेतला. रेडिओ बनवणं थांबवूयात. कारण जर ‘नेल्को’ला नव्याने उभं करायचं असेल तर आपल्याला नवा विचार आणावा लागेल. आपण सॅटलाईट कम्युनिकेशनवर काम सुरु करूयात, असं रतन टाटांनी सुचवलं. तसं काम सुरु झालं आणि 1975 ला पुन्हा एकदा ‘नेल्को’ चा मार्केट शेअर 20 टक्क्यांवर आला. ‘नेल्को’ ला रतन टाटांनी पुन्हा पूर्वपदावर आणलं. पण पुढे आणीबाणी लागली अन् हा ‘नेल्को’चा व्यवसाय बंद झाला. पण या सह अन्य उद्योगांमध्ये रतन टाटा यांचं योगदान मोठं आहे.

जे ‘नेल्को’ डबघाईला आलं होतं. तिथं रतन टाटा यांनी एन्ट्री केली आहे. स्वत: चा ठसा उमटवत त्यांनी या उद्योगाला नवी उभारी दिली. रतन टाटा यांनी जे. आर. डी. टाटा यांनी उभारलेला व्यवसाय रतन टाटांनी आणखी पुढे नेला.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.