Raut on Raj: तुमचे म्हसोबा बदलले, महाराष्ट्र द्वेष्ट्या सोमय्याच्या गळ्यात पदक घाला; राज यांच्या उत्तरसभेची राऊतांकडून यथासांग पूजा

आयएनएस विक्रांत वाचवा म्हणून कोट्यवधी हडपणारा सोमय्या तुम्हाला प्रिय असेल, तर या महाराष्ट्र द्वेष्ट्याच्या गळ्यात शिवतीर्थावर नेऊन पदक घाला, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या उत्तरसभेची आज बुधवारी सकाळी-सकाळी यथासांग पूजा केली.

Raut on Raj: तुमचे म्हसोबा बदलले, महाराष्ट्र द्वेष्ट्या सोमय्याच्या गळ्यात पदक घाला; राज यांच्या उत्तरसभेची राऊतांकडून यथासांग पूजा
संजय राऊत
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 10:54 AM

मुंबईः दिवा विझताना जास्त फडफडतो. तुमची अक्कल दीड वर्षे ईडी कार्यालयात गहाण पडली होती. आता तुमचे म्हसोबा बदलले. अभय मिळाल्याने तुमचा भोंगा वाजतोय. तुमच्या तोंडाला दुसऱ्याच कोणीतरी भोंगा लावलाय. आयएनएस विक्रांत वाचवा म्हणून कोट्यवधी हडपणारा सोमय्या (Kirit Somaiya) तुम्हाला प्रिय असेल, तर या महाराष्ट्र द्वेष्ट्याच्या गळ्यात शिवतीर्थावर नेऊन पदक घाला, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उत्तरसभेची आज बुधवारी सकाळी-सकाळी यथासांग पूजा केली. राज यांचे कालचे बोलणे किती योग्य-अयोग्य हा भाग अलहिदा. मात्र, त्यांच्या वाकबाणांनी महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांना घायाळ केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत महाजन, जितेंद्र आव्हाड या साऱ्यांचाच त्यांनी खरपूस समाचार घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात ठिणग्या पडतायत. आता शब्दाने शब्द वाढत जाणार. राऊतांची आजची पत्रकार परिषद त्याचेच एक मासलेवाईक उदाहरण आहे.

हा कसला अल्टीमेटम? 

संजय राऊतांनी राज ठाकरेंवर आपल्या शेलक्या रोखठोक शैलीतून प्रहार केले. ईडीचे अभय मिळाल्याने तुमचा भोंगा वाजतोय. तुमची वर्ष दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. तुमचे म्हसोबा बदलले असतील. तुम्ही दुसरा शेंदूर लावून घेतला. मात्र, आमचा बाणा तोच आहे, अशा जहाल शब्दांत त्यांनी राज यांना डिवचले आहे. अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. त्यांनी दहशतवाद्यांना अल्टीमेटम दिला. हा कसला अल्टीमेटम. हे वैफल्यातून सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

सोमय्याची तिच लायकी

राऊत म्हणाले की, किरीट सोमय्याची लायकी शिव्या देण्याचीच आहे. आयएनएस विक्रांत वाचवा म्हणून कोट्यवधी रुपये हडप करणारा सोमय्या तुम्हाला प्रिय असेल, तर तुमचं खासगीचं पदक देऊन टाका. या महाराष्ट्र द्रोह्याच्या गळ्यात शिवतीर्थावर ते पदक घाला. जर महाराष्ट्रावर, मुंबईवर कोणी थुंकण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझ्यासारखा प्रत्येक शिवसैनिक, मराठी माणूस अशा प्रकारची शिवराळ भाषा वापरेल. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांनी हीच भाषा वापरली, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

मुंबई वेगळी करण्याचा डाव

संजय राऊत म्हणाले की, ढोंग आणि भंपकपणा सुरू असल्याचे काल पुन्हा सिद्ध झाले. एका द्वेषातून तुम्ही बोलताय. तुमच्या तोंडाला कोणीतरी भोंगा लावलाय. शिवसेनेचे हिंदुत्व प्रखर आहे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. शिवसेनाचा मुख्यमंत्री आहे. त्यांचा बाणा प्रखर हिंदुत्ववादी आहे. किरीट सोमय्या मुंबई-महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न करतोय. दिल्लीत केंद्राला जाऊन वारंवार सांगतोय, असा आरोपही त्यांनी केला. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.