राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांचा दणका, नोटीस धाडली, दोषारोपपत्र दाखल करणार, न्यायलयात हजर राहण्याचेही आदेश

मुंबई राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 8 जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांचा दणका, नोटीस धाडली, दोषारोपपत्र दाखल करणार, न्यायलयात हजर राहण्याचेही आदेश
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 2:21 PM

मुंबई :  राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 8 जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस या दोघांविरोधात दोषारोपपत्रही दाखल करणार आहेत. रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांना वांद्रे न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

राणा दाम्पत्याला नोटीस

रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार केला होता. पण त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं शिवाय त्यांना या प्रकरणी अटक देखील करण्यात आली होती. याच प्रकरणी आता त्यांना न्यायायलात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. 8 जूनला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस या दोघांविरोधात दोषारोपपत्रही दाखल करणार आहेत. रवी राणा आणि नवनीत राणा यांना वांद्रे न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सध्या राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी आमदार रवी राणा राज्यसभेसाठी मतदान करणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.

अमरावतीत गुन्हे दाखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे हनुमान चालिसा प्रकरणानंतर 36 दिवासांनी 28 मेला हे दोघे अमरावतीत परतले. राणा दाम्पत्य अमरावतीत परतताच त्यांनी नागपुरात हनुमान चालीसा पठण करत सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवला. त्यांच्या समर्थकांनी अमरावतीत त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यांची भव्य रॅलीही काढण्यात आली. तसेच रात्री उशीरापर्यंत दुग्धाभिषेक आणि इतर कार्यक्रम केले.त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अमरावतीत राणा दाम्पत्याच्या स्वागत रॅली प्रकरणी रवी राणांच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. गाडगेनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये रवी राणा व नवनीत राणा यांच्यासह जवळपास दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती येथील शंकर नगर येथील राणा यांच्या घरासमोर रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण केले आणि मध्यरात्रीच्या 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावून कार्यक्रम घेतला त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले आहेत. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन-या पोलीस ठाण्यात 7 ते 8 आयोजकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.