‘हम साथ-साथ हैं’, शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांचा सूर बदलला

"हम साथ-साथ हैं, आमचा वाद मिटलेला आहे", असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं

'हम साथ-साथ हैं', शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांचा सूर बदलला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 12:12 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार ते पाच दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादामुळे अनेक घडामोडी घडल्या. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. शिंदे-फडणवीस यांनी रवी राणा आणि बच्चू कडू या दोन्ही नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं. त्यानुसार हे दोन्ही नेते रविवारी मुंबईत आले त्यानंतर रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोघांची समजूत घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन करण्यात आलं. त्यानंतर आज आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे एकमेकांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारे नेते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आल्याचा दावा स्वत: रवी राणा यांनी केलाय. तसेच रवी राणा यांनी ‘हम साथ-साथ हैं’ असं म्हटलं आहे.

“हम साथ-साथ हैं, आमचा वाद मिटलेला आहे”, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. आमदार बच्चू कडू आणि मी आम्ही दोघांनी एकत्र येऊन वाद मिटवला आहे”, असं विधान रवी राणा यांनी केलं. “विरोधकांचं टीका करण्याचं एक कलमी काम सुरुय”, असंही ते म्हणाले.

“हम साथ-साथ हैं. कारण हे सरकार महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री-उमुख्यमंत्री महाराष्ट्रात जे काम करत आहेत, महाराष्ट्राला वेगाने पुढे नेण्याचं काम सरकार करत असेल तर त्यामध्ये असे वादविवाद नसले पाहिजेत. म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येऊन हा विषय संपवला आहे. पुढे महाराष्ट्रात अनेक विकासाची कामे करायची आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

बच्चू कडू यांचं पोश्टर चर्चेत

दरम्यान, रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केल्याने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे कार्यकर्ते उद्या आंदोलन करणार आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचं लावण्यात आलेलं पोश्टर हे चर्चेला कारण ठरलं आहे. कारण या पोश्टरवर “मै झुकेंगा नहीं”, असं लिहिलं आहे. तसेच सोबत बच्चू कडू यांचाही फोटो पोश्टरमध्ये आहे. त्यामुळे बच्चू कडू उद्या कार्यकर्त्यांसमोर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल.
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी.
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर.
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ.
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट.
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.