विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची थट्टामस्करी थांबवावी, नाही तर कार्यालयं…
सोयाबीन, कापूस उत्पादक आणि जलसमाधी आंदोलनामुळेच त्या ठिकाणी विमा कंपन्याही टाळ्यावर आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईः विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेली भरपाई म्हणजे शेतकऱ्यांची लावलेली थट्टा असल्याची टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. यावेळी त्यांनी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनाची आठवण करुन देत सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही हजारो शेतकरी मुंबईला गेलो.
सोयाबीन, कापूस उत्पादक आणि जलसमाधी आंदोलनामुळेच त्या ठिकाणी विमा कंपन्याही टाळ्यावर आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या जलसमाधी आंदोलनाच्या धसक्यामुळेच सरकारच्या पायाखालची वाळू सरकली असंही त्यांनी सांगितले.
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच विमा कंपन्यांना पैसे देण्यास भाग पाडले असंही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जवळपास 2142 कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे मंजूर झाले आहेत.
त्यामध्ये 942 कोटी रुपये जमा झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही विमा कंपन्यांकडे 1205 कोटी रुपये अजून बाकी आहे परंतु काही ठिकाणी प्रीमियम पेक्षा सुद्धा कमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. तर 60 रुपये, 70 रुपये आणि 300 रुपये अशी किरकोळ रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर आली आहे.
त्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांना त्यांनी इशारा दिला असून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवून घ्या असा सल्लाही त्यांनी विमा कंपन्याना दिला आहे.
नुकसाना भरपाईविषयी त्यांनी विमा कंपन्याना इशारा देत शेतकऱ्यांकडून तुम्ही पुन्हा अर्ज दाखल करुन घ्या आणि 100 टक्के नुकसाना भरपाईची रक्कम जाचक निकषामध्ये न अडकवता ती शेतकऱ्यांना मिळवून द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यामधील जीएसआय कंपनी आहे. ज्या कंपनीचे कार्यालय मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये आहे. मागच्या वर्षी या कंपनीचा ताबा आम्ही अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला होता,
आणि त्यांना पैसै मिळवून दिले होते. त्यामुळे आताही त्यांनी शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई दिली तर मुंबईतील कंपनीचे कार्यालय उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.