Eknath Shinde: शिंदे विरुद्ध ठाकरे! हरिश साळवे मांडणार शिंदेंची बाजू, तर कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी सरकारच्या बाजूने युक्तिवाद करणार

Eknath Shinde vs Uddhav Thackeray in Supreme Court : बंडखोर आमदारांचे संख्याबळ दाखवून एकनाथ शिंदे गटांनी आमदार गोगावले यांची गटनेते पदी निवड केल्याचे जाहीर केले. त्यामुळे या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध ठाकरे! हरिश साळवे मांडणार शिंदेंची बाजू, तर कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी सरकारच्या बाजूने युक्तिवाद करणार
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 6:42 AM

मुंबईः राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून बंडखोरी नाट्य आता न्यायायलात गेले आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Rebel MLA Eknath Shinde) यांच्यावर गटनेते पदावरून कारवाई आणि 16 आमदारांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका (Petition to the Supreme Court) दाखल करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या याचिकेवर सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सगळ्या राज्यासह देशातील राष्ट्रीय पक्षांचे लक्ष आता आजच्या सुनावणीकडे लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून हरिष साळवे बाजू मांडणार आहेत तर देशातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी बंड करून मुंबई, सूरत आणि गुवाहाटी असा प्रवास केल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला.

गटनेते पदाची लढाई न्यायालयात

या घटना घडत असतानाच आमदार चौधरी यांची शिवसेनेकडून गटनेतेपदी निवड करून मंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर तात्काळ बंडखोर आमदारांचे संख्याबळ दाखवून एकनाथ शिंदे गटांनी आमदार गोगावले यांची गटनेते पदी निवड केल्याचे जाहीर केले. त्यामुळे या राजकीय घडामोडींना आणखी वेग आला. आमदारांच्या बंडखोरीवर निलंबनाची कारवाईप्रकरणीही दोन्हीकडून प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

त्या 16 बंडखोरांवर कारवाई

शिवसेनेचे 16 बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर गटनेतेप्रकरणी झालेली कारवाईबद्दल एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे उद्या विधानसभा उपाध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात ॲड.रवीशंकर जंध्याल बाजू मांडणार आहेत. याबाबत त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे.

 मुख्यमंत्र्यांबरोबर वकीलांची चर्चा

कोणत्या मुद्यांवर प्रतिवाद करायचा या मु्द्द्यांबाबतही मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यात आली असून राजकीय पक्षाला व्हिप जारी करण्याचे अधिकार असल्याचं रवीशंकर जंध्याल यांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात वकील कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता पहिल्यांदा आता 16 आमदारांवर कारवाई होणार की, बंडखोर नेत्यांच्या बाजूने न्यायालय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतरच्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.