शिंदे गटातील खासदार, आमदारांना पुन्हा सोबत घेणार का?, संजय राऊत यांचं मोठं विधान; आता सर्व…

स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. चर्चा करून घेतली. आता गजाभाऊ सांगत आहेत आम्हाला लाथा घालत आहे. सासूरवास करत आहे. तेच सांगत आहेत. म्हणजे भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही.

शिंदे गटातील खासदार, आमदारांना पुन्हा सोबत घेणार का?, संजय राऊत यांचं मोठं विधान; आता सर्व...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 11:08 AM

मुंबई : शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार आणि खासदारांना ठाकरे गटात पुन्हा प्रवेश मिळणार की नाही? याची चर्चा अजूनही जोरात आहे. काहींच्या मते बदलत्या राजकीय परिस्थितीत फुटून गेलेल्या नेत्यांना पुन्हाठाकरे गटात प्रवेश दिला जाऊ शकतो. कारण आदित्य ठाकरेंपासून संजय राऊतांपर्यंत अनेकांनी तसे सुतोवाच केलं होतं. तर काहींच्या मते उद्धव ठाकरे या फुटीर नेत्यांना कदापि माफ करणार नाहीत. त्यामुळे या खासदार आणि आमदारांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असं काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, बेईमानी केली. ज्यांनी केवळ पैशासाठी बेईमानी केली त्यांना परत पक्षात प्रवेश देणार नाही. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्यात रोष आहे. त्यामुळे या गद्दारांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मेसेज करतात, भेटतात. वेदना बोलून दाखवतात. पण तरीही त्यांना प्रवेश देणार नाही, असं राऊत यांनी निक्षून सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आम्ही काय वेगळं सांगत होतो?

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गजाभाऊ कीर्तिकर आम्ही एकत्र असताना ते आमचे जवळचे सहकारी होते. त्यांनी सोडून जाणं हे आमच्यासाठी वेदनादायी होतं. त्यांच्या गटाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे. त्यांना अपमानित केलं जात आहे, असं कीर्तिकर यांनी सांगितलं. कीर्तिकर आता बोलत आहेत. मग आम्ही काय वेगळं सांगत होतो? भाजप ठाकरे यांच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक देत आहे. शिवसेनेला खतम करण्याच्या भूमिकेतून काम करत होती. म्हणून शिवसेना वेगळी झाली, राऊत म्हणाले.

चिडीतून भाजपपासून दूर गेलो

भाजप अजगर आणि मगर आहे. जे सोबत गेले त्यांना खाऊन टाकलं. आता मिंधे गटाला अनुभव येत आहे. हळूहळू कळेल या मगरीपासून दूर जाण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती. हा फुटलेला गट आहे. त्यांच्यात अस्वस्थता आहे. नाराजी आहे. झालेल्या गटात दोन गट पडले आहेत. कीर्तिकर यांनी सांगितलं तीच भूमिका आमची पहिल्यापासून होती. त्याच चिडीतून आम्ही भाजपपासून दूर गेलो. त्यांनी दिलेले शब्द पाळले नाही, असं त्यांनी सांगितलं.

भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही

भाजपने आम्हाला निधी मिळू दिला नाही. त्यावेळी भाजपने शिवसेनेच्या अनेक आमदारांची कामे रखडून ठेवली होती. अनेक शब्द दिले होते. ते पार पाडले नाही. प्रमुख लोकांना अपमानित केलं. सत्तेत समान भागिदारीही दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. चर्चा करून घेतली. आता गजाभाऊ सांगत आहेत आम्हाला लाथा घालत आहे. सासूरवास करत आहे. तेच सांगत आहेत. म्हणजे भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही. कीर्तिकर तिथे गेले तरी सुखात नाही, समाधानी नाहीत याचा अर्थ खुराड्यातील एक एक कोंबडी कापली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.