Sanjay Raut: हे सगळं खोटेपणाच्या पायावर उभं आहे; त्यांना कोणताही अधिकार नाही; शिंदेंचं मुख्यमंत्रीपदच राऊतांनी निकाली काढलं

नवी दिल्लीः शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sajay Raut) यांची आज दिल्लीत पत्रकार परिषदे झाली त्यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटावर राऊत स्टाईलने तोफ डागत त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, शिंदे गटाचा जो काही प्रकार चालू आहे तो कॉमेडी एक्सप्रेस सीझन टू […]

Sanjay Raut: हे सगळं खोटेपणाच्या पायावर उभं आहे; त्यांना कोणताही अधिकार नाही; शिंदेंचं मुख्यमंत्रीपदच राऊतांनी निकाली काढलं
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 9:42 PM

नवी दिल्लीः शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sajay Raut) यांची आज दिल्लीत पत्रकार परिषदे झाली त्यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटावर राऊत स्टाईलने तोफ डागत त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, शिंदे गटाचा जो काही प्रकार चालू आहे तो कॉमेडी एक्सप्रेस सीझन टू चालू असल्याचे सांगत पहिला भाग हा महाराष्ट्रातील विधीमंडळात घडला असून आता दुसरा भाग हा लोकसभेत चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिली कारवाई मुख्यमंत्री यांच्यावरच

बंडखोर आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यातील ज्या बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) याचिका दाखल केली आहे त्यांच्यावर कारवाई ही होणार आहेच, मात्र त्यामध्ये पहिली कारवाई ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यावरच होणार असल्याचे सांगत त्यांचे मुख्यमंत्री पदचहे घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले.Sanjay Raut: हे सगळं खोटेपणाच्या पायावर उभं आहे; त्यांना कोणताही अधिकार नाही; शिंदेंचं मुख्यमंत्रीपदच राऊतांनी निकाली काढलं

कायद्याचा आधार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांकडून जो प्रकार चालू असून त्याला कोणत्याही कायद्याचा आधार नसल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विधिमंडळात जो प्रकार केला तोच प्रकार लोकसभेत करण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यानुसार कायद्यानुसार जर कारवाई झाली तर ही पहिली कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच होणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

फुटीर गट कसा काय बरखास्त करु शकतो

खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाचा इतिहास सांगताना ते म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पक्षाची 56 वर्षापूर्वी कार्यकारिणी जाहीर केली होती, त्या शिवसेना पक्षाची कार्यकारिणी एक फुटीर गट कसा काय बरखास्त करू शकतो असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री पद कसं घटनाबाह्य आहे हेही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले शिवसेनेतून जो बंडखोर गट बाहेर पडला आहे, आणि त्यांचे जे काही प्रकार चालू आहेत त्याला कोणताही आधार नाही, लोकशाहीची थट्टा चालवण्याचा प्रकार त्यांनी केला असल्याचे सांगितले.

सरकार निययबाह्य

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सोळा दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही कारण त्यांना माहिती आहे हे सरकार निययबाह्य आहे म्हणून शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.