Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तोपर्यंत कारवाई करू नका, रिपब्लिक चॅनलची पोलिसांना विनंती; सुप्रीम कोर्टात धाव

टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कारवाई विरोधात अर्णव गोस्वामीच्या रिपब्लिक चॅनेलनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी होईपर्यंत कारवाई न करण्याची विनंती रिपब्लिकच्या वतीनं करण्यात आली आहे.

...तोपर्यंत कारवाई करू नका, रिपब्लिक चॅनलची पोलिसांना विनंती; सुप्रीम कोर्टात धाव
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 6:20 PM

मुंबई: टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कारवाई विरोधात अर्णव गोस्वामींच्या रिपब्लिक चॅनेलनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. पुढील आठवड्यात रिपब्लिकच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये,असं रिपब्लिक चॅनेल तर्फे मुंबई पोलिसांना कळवण्यात आलं आहे. यामुळे रिपब्लिक चॅनेलचे सीएफओ शिवा सुब्रम्हणयम चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ( Republic request Mumbai Police to halt investigations in TRP Scam till hearing of writ petition filed before the Supreme Court)

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली आहे. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं आहे.यामुळे पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलवर कारवाई करायला सुरुवात केली होती. त्यानुसार रिपब्लिक चॅनेलचं सी एफ वो शिवा सुब्रम्हणयम यांना आज क्राईम ब्रांच च्या अधिकाऱ्यांनी चौकशी साठी बोलावलं होतं.मात्र,त्या आधीच रिपब्लिक चॅनेलने सकाळीच सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे.

रिपब्लिक चॅनेलने घटनेच्या कलम 32 नुसार याचिका केली आहे. त्याचा क्रमांक 7848/2020 असा आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. यामुळे आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने आपण तपासाची घाई करू नये, अस शिवा सुब्रम्हणयम यांनी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलीस 5 जणांची चौकशी करणार होते. शिवा सुब्रम्हणयम,आईएफवो,रिपब्लिक चॅनेल, सॅम बलसारा , चेअरमन , मॅडसन जाहिरात कंपनी, शशी सिन्हा , लिंटास जाहिरात कंपनी, फक्त मराठी चॅनेलचे सी इ ओ आणि बॉक्स चॅनेलचे सीइओ यांची चौकशी होणार होती.

मात्र,आजच्या चौकशीला केवळ मॅडसन कंपन चे मालक सॅम बालसारा आणि लिंटासचे शशी सिन्हा हे दोघेच हजर होते. बाकी सर्वांनी आपण बाहेर आहोत,असं सांगून चौकशीला दांडी मारली. सुमारे सात तासाच्या चौकशी नंतर त्या दोघांना सोडून देण्यात आलं.

 संबंधित बातम्या:

Sanjay Raut | टीआरपीसंदर्भात मुंबई पोलीस सत्य समोर आणतील: संजय राऊत

BARC Fake TRP Racket | अडाणी लोकांच्या घरातही इंग्रजी चॅनल, ‘रिपब्लिक’कडून TRP चा खेळ, दोन मालकांना अटक : मुंबई पोलीस

( Republic request Mumbai Police to halt investigations in TRP Scam till hearing of writ petition filed before the Supreme Court)

संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...