Special Report |’स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’ यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बिनसतंय? पाहा नेमंक काय?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हत तर ते स्वराज्यरक्षक होते या माझ्या विधानावर मी ठाम असल्याचे सांगत स्वराज्यरक्षक बिरुदात सर्व जाती-धर्म येतात असा इतिहास असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केले. त्यानंतर सत्ताधारी, शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन करत त्यांच्यावर टीका केली. या आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते पदाचा अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्या पुतळ्याचा कडेलोट करत अजित पवार यांनी माफी मागावी नाही तर राज्यात शिवप्रेमी अजित पवारांना फिरू देणार नाहीत असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
नितेश राणे यांनी टीका केल्यानंतर अशा टिल्यांनी मला सांगायचं नाही, त्यांना माझे प्रवक्ते उत्तर देतील अशी सडकून टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हत तर ते स्वराज्यरक्षक होते या माझ्या विधानावर मी ठाम असल्याचे सांगत स्वराज्यरक्षक बिरुदात सर्व जाती-धर्म येतात असा इतिहास असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचं रक्षण आणि विस्तार केला असल्याचे सांगत माझं मत प्रत्येकाला पटावंच असं नाही असा खुलासाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांना सांगितला.
छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणतो काही जण धर्मवीर म्हणतात पण राजे धर्मवीर नव्हते. त्यांनी कधी धर्माचा पुरस्कार केला नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितेल.
मी माझी भूमिका मांडली आहे, ज्यांना योग्य वाटते त्यांनी ती स्वीकारा, आणि ज्यांना योग्य वाटत नाही त्यांनी ती सोडून द्या असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
ज्या लोकांनी आपल्या विरोधात आंदोलन केले आहे. त्यांना हायकमांडचा आदेश होता. त्यामुळे त्यांना आंदोलन करावे लागले आहे. ज्यांनी आंदोलन केले होते, त्यांचा आपल्याला फोन आला होता. तुम्ही काही चुकीचं बोलला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.