पूरग्रस्तांसाठी विलासरावांचा मुलगा धावला, रितेशकडून 25 लाखांची मदत
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh deshmukh) पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची मदत केली.
मुंबई : सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी (Maharashtra Floods) अवघा महाराष्ट्र सरसावला आहे. स्थानिक लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटीपर्यंत अनेकजण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने (Ritesh deshmukh) पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची मदत केली. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत (CM Relief Fund) रितेशने 25 लाखांचा चेक सुपूर्द केला आहे. यावेळी त्याची पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) त्याच्यासोबत होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. रितेश आणि जेनेलियासोबतने 25 लाख रुपयांचा चेक देतानाचा एक फोटो ट्वीट केला आहे. यासोबत मुख्यमंत्र्यांनी त्या दोघांचे आभार मानले.
Thank you Riteish and Genelia Deshmukh for the contribution of ₹25,00,000/- (₹25 lakh) towards #CMReliefFund for #MaharashtraFloods !
@Riteishd @geneliad pic.twitter.com/Y6iDng2epD
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 12, 2019
त्यानंतर मुख्यमंत्र्यांची ही पोस्ट शेअर करताना रितेशने एक भावूक पोस्ट लिहली. “गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रसह देशभरात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ पाहून मला धक्का बसला. त्यानंतर मी आणि जेनेलियाने पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला.”
Over the past few days the floods have caused havoc in Maharashtra & other parts of the country..the visuals have been distressing and disturbing, @geneliad and myself met our Hon CM this morning and made a humble contribution towards the CM Relief Fund through ‘Desh Foundation’. https://t.co/t8XaFAuT3A
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 12, 2019
सांगलीतील काही महिलांनी आर्मीतील जवानांना राखी बांधली होती. याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करत “ही आपली संस्कृती आहे,” असे म्हटलं होतं.
This will make your day. Gratitude to the saviours. Women tying Rakhis to our brave soldiers. यही हमारी संस्कृति है! जय हिंद!! #Sangli #Maharashtra pic.twitter.com/UrUKr5Tj3C
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 12, 2019
गेल्या आठवडाभरापासून कोल्हापुरात (Sangli Kolhapur Flood) पूरस्थिती आहे. त्यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालं. या पुराने कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. सांगलीतील पुराने अनेकांचं अतोनात नुकसान केलं. बहुतेकांच्या घरातील सगळं साहित्य वाहून गेलं. त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले.
यामुळे अनेक ठिकाणाहून आवश्यक धान्य, औषधं, कपडे यासारखी मदत पूरग्रस्तांना केली जात आहे. यात सर्वसामान्य लोकांप्रमाणे मराठी कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे. मात्र मदत करणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्यांचे नावच नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.