ऋतुजा लटकेंनी उमेदवारी अर्ज भरावा, तुम्हाला काही अडचण येणार नाही, डॉ. अभय पाटील असं का म्हणतात?
त्यांनी भाजपच्या दबावाने माझा राजीनामा मंजूर केला नव्हता.
गणेश सोनोने, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अकोला : अंधेरी पोटनिवडणुकीवरून डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले. जाणून बुजून माझ्या अर्जावर सही न केल्याचा त्यांनी आरोप केला. तर ऋतुजा लटके यांनी न डगमगता अर्ज भरावा. तुम्हाला नक्की निवडणूक लढता येईल, असं डॉ. अभय पाटील म्हणतात. ऋतुजा लटके (Rituja Latke) यांचे प्रकरण बघता 2019 ला अकोल्याचे काँग्रेस नेते अभय पाटलांना फटका बसला होता. 2019 ला अकोला लोकसभा निवडणुकीत (Akola Lok Sabha Election) काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांचाही राजीनामा मंजूर केला गेला नव्हता.
त्यावेळी एकनाथ शिंदे मंत्री होते. त्यांनी भाजपच्या दबावाने माझा राजीनामा मंजूर केला नव्हता. अभय पाटलांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप केलाय.
कर्मचाऱ्याने मुदतीत राजीनामा दिला असेल आणि वरिष्ठांनी तो मंजूर केला नाही, तरी तो मंजूर समजला जातो, अशी कायद्यात तरतूद आहे, असे आम्हाला नंतर समजले, असं अभय पाटील म्हणाले.
त्यामुळे ऋतुजा लटके यांनी न डगमगता कायद्याच्या आधारे लढावे. त्यांना नक्कीच निवडणूक लढता येईल अभय पाटलांची माहिती दिली.
पण माझ्या वेळेस याची माहिती आणि वेळ नव्हती. पण येणारी 2024 ची लोकसभेची निवडणूक लढणार आहे. त्याची तयारी सुरू केली आहे. मी यात पूर्णपणे यशस्वी होईल, असा ठाम निर्धार डॉ. अभय पाटील यांनी Tv9 समोर बोलून दाखवला आहे.