प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद नाही तर वैयक्तिक गिफ्ट मिळालंय; शरद पवार गटातील नेत्याचा मोठा दावा
Rohit Pawar on Praful Patel : अजित पवार गटाला मंत्रिपदासाठी अद्यापही फोन आलेला नाही. यावरून अजित पवार गटाला डिवचण्यात आलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याने भाष्य केलंय. त्यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणण्यात आलंय? वाचा सविस्तर...
आज संध्याकाळी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मात्र या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाला निमंत्रण दिलेलं नाही. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलंय. जे नेते शरद पवारसाहेबांना सोडून गेले त्यांना व्यक्तिगत खूप काही मिळालं आहे. प्रफुल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट दिलंय. ईडीने त्यांची प्रॉपर्टी सोडवली जी अडचड केली होती . त्यामुळं मंत्रिपद मिळालं नाही तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळालं आहे, असं रोहित पवार म्हणालेत.
अजित पवार गटावर निशाणा
आता जे शरद पवारसाहेबांना सोडून गेले. आता त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल ते म्हणजे राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या चिन्हवर त्यांना लढावं लागेल. राज्यातले नेते समजूत काढाण्याचा काम करू शकतात बाकी त्यांच्या हातात काहीच नाही. प्रफुल पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत हात धुवून घेतले. ईडीचा कारवाई प्रफुल पटेल यांची संपली दादा, सुनिल तटकरे यांची सुरु आहे, असंही रोहित पवार म्हणालेत.
सगळ्यात जास्त फायदा प्रफुल पटेल यांचा झाला बाकी आता एवढंच सांगतो. फुटलेला राष्ट्रवादी पक्ष हा आता अजित पवार यांचा राहणार नाही. आता तो भाजपचा होणार आहे. कारण एकही मंत्रिपद त्यांना मिळालं नाही. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी केंद्राकडून आपल्या राज्यातल्या लोकांसाठी काही गोष्टी मागितल्या. आपल्या मुख्यमंत्र्यांनी- उपमुख्यमंत्र्यांनी काहीच मागितलं नाही, असं म्हणत रोहित पवारांनी महायुतीवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
एकनाथ शिंदेंना सवाल
श्रीकांत शिंदे यांनी केंद्रात मंत्रिपद न घेण्याला पसंती दिली. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल है वो बनेगा… म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रीकांत शिंदे काबील वाटत नाहीत का? माझ्या मते श्रीकांत शिंदे काबील आहेत. आता त्यांना वाटत असेल श्रीकांत शिंदे यांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी मंत्रिपद मिळावं. जरी श्रीकांत शिंदे यांना मंत्र पद मिळत नसेल. तरी त्यांच्या पक्षाच्या खासदार आणि राज्यातल्या आमदारांना त्यांचंच म्हणणं ऐकावं लागेल, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.