RSS BJP : विधानसभा काबीज करण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा प्रचारासाठी खास मंत्र, भाजपच्या वरिष्ठांना समजावून सांगितले हे तंत्र

BJP Election Campaign : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत अलिप्त राहिलेली मातृसंघटना आता विधानसभेपूर्वी सक्रिय झाली आहे. भाजपला प्रचाराचे तंत्र आणि मंत्र संघाने दिला आहे.

RSS BJP : विधानसभा काबीज करण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा प्रचारासाठी खास मंत्र, भाजपच्या वरिष्ठांना समजावून सांगितले हे तंत्र
भाजपला संघाचे बळ
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 6:37 PM

विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी कामाला लागले आहेत. यात्रा, सभा आणि आंदोलनाचा धडाका सुरु आहे. थेट जनतेत जाऊन ब्रँडिंग करण्याची एक संधी सुद्धा राजकीय पक्ष सोडताना दिसत नाही. यावेळी भाजपला संघाचे बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत संघाने तटस्थ भूमिका घेतली होती. झारखंड येथील पक्ष मेळाव्यात जे.पी. नड्डा यांनी केलेल्या विधानाची ही प्रतिक्रिया होती. पण विधानसभेसाठी भाजप-संघात दिलजमाई झाली आहे. विधानसभा काबीज करण्यासाठी संघाने भाजपला तंत्र आणि मंत्र दिला आहे.

लोकसभेनंतर भाजपने दूर केली नाराजी

लोकसभा निवडणूक एक हाती जिंकण्याचा भाजपचा विश्वास होता. पण काही राज्यात त्यांना जबरदस्त फटका बसला. त्यानंतर भाजपने संघाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सहकार्यवाह अरुण कुमार, संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यात दिल्लीत एक बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली.

हे सुद्धा वाचा

तरुण चेहऱ्यांना द्या स्थान

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या नेतृत्वासोबतच नवीन चेहऱ्यांना पण निवडणूक प्रचारात उतरवण्याची आग्रही मागणी संघाने भाजपकडे केली आहे. नवीन चेहरामुळे वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती दिली आहे. पण आता भाजपने या प्रक्रियेत हस्तक्षेप करत स्थानिक नेतृत्वासह नवीन चेहऱ्यांना पण संधी देण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संघाची भूमिका महत्वाची

निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि संघात बैठका होतात. पण या लोकसभेवेळी भाजप-संघात अशी बैठक झाल्याचे दिसून आले नाही. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने विधानसभेसाठी भाजप-संघात समन्वयाची सुरुवात झाली. त्यानुसार गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजप-संघात बैठकांचे सत्र सुरु झाले. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संघ संघटनात्मक दृष्ट्या पण सक्रिय भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.