Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. (Mohan Bhagwat meets Mithun Chakraborty)

मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व
सरसंघचालक मोहन भागवत मिथुन चक्रवर्तींच्या भेटीला
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 11:59 AM

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे. (RSS chief Mohan Bhagwat meets actor Mithun Chakraborty)

सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची बैठक महत्त्वाची मानली जाते.

“राजकीय नव्हे, कौटुंबिक भेट”

दरम्यान, ही कौटुंबिक भेट असल्याचं मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितलं. खूप दिवसापासून आम्हाला भेटायचं होतं. पण आमच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे वेळ मिळत नव्हती, असं चक्रवर्तींनी सांगितलं. मोहन भागवत यांनी आज घरी येऊन नाश्ता केला. नागपूरला त्यांनी मला सहकुटुंब बोलवलं आहे, असंही मिथुन चक्रवर्तींनी सांगितलं.

(RSS chief Mohan Bhagwat meets actor Mithun Chakraborty)

चक्रवर्ती-भागवत यांची आधीही भेट

मिथुन चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांची ही पहिलीच भेट नाही. ऑक्टोबर 2019 मध्येही दोघांची भेट झाली होती. नागपुरातील संघ कार्यालयात त्यावेळी दोघे भेटले होते.

मिथुन चक्रवर्ती तृणमूलचे माजी खासदार

पश्चिम बंगाल निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मिथुन चक्रवर्ती हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार होते. मात्र वारंवार गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.

भाजपचा चक्रवर्तींवर डोळा?

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्तींना भाजप विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिथुन यांची भेट घेऊन मोहन भागवत यांच्या माध्यमातून भाजप चक्रवर्तींना आपल्याकडे खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

मिथुन चक्रवर्तीला त्यांची मुलं ‘पप्पा’ म्हणत नाहीत, कारण…

मोहन भागवतांचं वक्तव्य मूर्खपणाचं, सोनम कपूरची आगपाखड

(RSS chief Mohan Bhagwat meets actor Mithun Chakraborty)

टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
टीव्ही 9च्या उपक्रमाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक.
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प
लाडक्या बहिणींची पात्रता पडताळणी ठप्प.
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू
साहेबांच्या कार्यकर्त्याचा आमदार निवासात मृत्यू.
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका
सचिन खरात यांची मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका.
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज
.. तरच आम्ही हे राम राज्य असल्याचं मानू, आदित्य ठाकरेंचं भाजपला चॅलेंज.
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.