राज ठाकरेंच्या भेटीसाठी संघाचे स्वयंसेवक ‘कृष्णकुंज’वर, कारण काय?

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली (RSS volunteers Raj Thackeray)

राज ठाकरेंच्या भेटीसाठी संघाचे स्वयंसेवक 'कृष्णकुंज'वर, कारण काय?
संघाच्या स्वयंसेवकांकडून राज ठाकरेंची भेट
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 1:26 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी ही भेट झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. (RSS volunteers meet MNS Chief Raj Thackeray at Krishnakunj)

उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम जन्मभूमि येथे भगवान रामाचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरासाठी देशभरातून निधी संकलनाचे काम सध्या सुरु आहे. या निधी संकलनाच्या अनुषंगानेच आज रा. स्व. संघाच्या काही सदस्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

निधी संकलनासाठी संघाचे सदस्य ‘कृष्णकुंज’वर

याबाबत बोलताना आरएसएसचे सदस्य विठ्ठल कांबळे म्हणाले की, राम मंदिराच्या निर्माणासाठी सध्या देशभरातून निधी संकलनाचे काम सुरु आहे. ही मोहीम 27 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील. या मोहिमेच्या अनुषंगाने राज ठाकरे यांची आम्ही भेट घेतली. यावेळी श्याम अग्रवाल, सुरेश बगेरिया, देवकिनंदन जिंदल उपस्थित होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी मदत आवश्यक आहे. ही मदत आम्ही करु, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले आहे.

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार

राज ठाकरे 1 ते 9 मार्च या कालावधीत अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. त्यानंतर आपण अयोध्या दौऱ्याचा मानस व्यक्त केला आहे, मात्र तारीख अद्याप ठरलेली नाही, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मनसे आमदाराकडून धनादेश

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश काही दिवसांपूर्वी मदत म्हणून दिला. राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली होती. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाल्याच्या भावना राजू पाटील यांनी व्यक्त केल्या होत्या. (RSS volunteers meet MNS Chief Raj Thackeray at Krishnakunj)

राम मंदिरासाठी अनेकांकडून देणग्या

राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखाचा धनादेश दिला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या :

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी मनसे आमदार राजू पाटलांकडून अडीच लाखांची मदत

राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार : विहिंप

मनसेचा मेगाप्लॅन, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा ठरला

(RSS volunteers meet MNS Chief Raj Thackeray at Krishnakunj)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.