वाहनांना फिटनेस सर्टीफिकेट्स देण्यास विलंब, प्रमाणपत्रासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा, ‘RTO’कडून टेस्टिंग ट्रॅकसाठी जागेचा शोध

मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र फिटनेस सर्टीफिकेट्ससाठी आवश्यक असणारा योग्य टेस्टिंग ट्रॅक नसल्याने प्रमाणपत्र देण्यास विलंब होत आहे. आता आरटीओकडून टेस्टिंग ट्रॅकसाठी जागेचा शोध सुरू आहे.

वाहनांना फिटनेस सर्टीफिकेट्स देण्यास विलंब, प्रमाणपत्रासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा, 'RTO'कडून टेस्टिंग ट्रॅकसाठी जागेचा शोध
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 8:00 AM

मुंबई : शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, दरवर्षी हजारो नव्या वाहनांची (New vehicles) भर पडत आहे. सध्या ही वाढती वाहनांची संख्या परिवहन विभागासाठी (RTO) डोकेदुखी ठरली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून (High Court) वाहनांच्या टेस्टिंग ट्रॅकसाठी 250 मीटर लांबीचा ट्रॅक तयार करण्यात यावा असे आदेश आरटीओ विभागाला देण्यात आले आहेत. मुंबईत ताडदेव, वडाळा अंधेरी आणि बोरिवली असे प्रमुख चार आरटीओ आहेत. त्यापैकी ताडदेव आरटीओ विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे टेस्ट ट्रॅक बांधला आहे. टेस्ट ट्रॅकचे काम पूर्ण होऊन वाहनाच्या टेस्टला देखील सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे वडाळा आरटीओमध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी होत असताना देखील त्यांना अद्याप 250 मीटर लांबीचा ट्रॅक तयार करण्यासाठी जागा सापडलेली नाहीये. वाहनांना वेळेत फिटनेस सर्टीफिकेट्स मिळत नसल्याने अशी वाहने धोकादायक अवस्थेमध्ये रस्त्यावर चालवली जातात. मात्र या वाहनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे उच्च न्यायालयाकडून परिवहन विभागाला 250 मीटर लांबीचा ट्रॅक तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत किती वाहने?

मुंबईमध्ये वाहनांच्या संख्येत भर पडतच आहे. शहरात वाहनांची एकूण संख्या नेमकी किती याबाबत 31 मार्च 2022 ला एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत तब्बल 2 लाख 33 हजार 325 ऑटो रिक्षा, 44 हजार 171 टॅक्सी, तर 3 हजार 86 स्कूल बस यांच्यासह एकूण 42 लाख 81 हजार 251 वाहने आहेत. मात्र टेस्टिंग ट्रॅक अभावी या वाहनांना फिटनेस सर्टीफिकेट्स मिळण्यास विलंब होत आहे. अनेक वाहनांकडे फिटनेस सर्टीफिक नसते. या वाहनांची तपासणी झाली नसल्याने ही वाहने धोकादायक ठरू शकतात. ही अडचण दूर करण्यासाठी आता आरटीओ विभागाकडून ट्रॅकसाठी जागेचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

रिक्षा चालकांना फटका

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार टेस्ट ट्रॅकवर ऑटो रिक्षांची ब्रेक तसेच अन्य टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. मात्र टेस्ट ट्रॅकच्या कमतरेभावी वाहनांच्या एक ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागतात. लवकर नंबर लागत नसल्याने रिक्षाचालकांचा एक दिवसांचा धंदा बुडतो. त्यांना याचा मोठा फटका बसत आहे. टेस्ट ट्रॅकची समस्या लवकरात लवकर सोडवली जावी अशी मागणी रिक्षा चालकांसह इतर वाहनधारकांमधून होत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.