नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी, पण नंतर पुढं काय..?

राहुल शेवाळे यांच्यावर महिलेनं केलेल्या आरोपात एसआयटी नेमण्याची मागणी ठाकरे गटाच्या मनिषा कायंदे यानी केली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी मनिषा कायंदे यांच्याकडून ज्येष्ठ नेत्यांचं ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता.

नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी, पण नंतर पुढं काय..?
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 11:33 PM

मुंबईः हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून राज्यात आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मागच्या 5 दिवसात महाराष्ट्रात आरोपांचा फक्त धुराळा उडतो आहे. प्रत्येक आरोपाला एका नव्या आरोपानं उत्तर दिलं जातं आहे. गेल्या पाच दिवसातील आरोपांची यादी बघितली तर मात्र ती यादी वाढतच जातान दिसत आहे.  जो व्यक्ती आरोप करतो आहे, त्यावर दुसऱ्याच दिवशी नवे आरोप लागत आहेत. त्यामुळे मागच्या पाच दिवसात महाराष्ट्राचं राजकारण याच दिशेनं पुढे सरकतं आहे. कुणी एक बोट दाखवलं की लगेच त्याच्यावरही दुसरं बोट दाखवलं जातं आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुंबई-सुरत रस्त्यावरुन शिंदे गटावर टीका केली होती. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी AU नंबरवरुन रिया चक्रवर्ती प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं होतं.

कथित घोटाळ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले. त्यानंतर भाजप आमदारांनी दिशा सालियान प्रकरणात एसआयटीची मागणी करत सभागृह बंदही पाडलं. विधानसभेत फडणवीस यांनी दिशा प्रकरणात एसआयटी चौकशी नेमण्याची घोषणा केली होती.

नंतर विधानपरिषदेत ठाकरे गटाच्या आमदारांनी शेवाळेंवर महिलेनं केलेल्या आरोपांचा मुद्दा लावून धरला. आणि नीलम गोऱ्हे यांनीही शेवाळेंविरोधात एसआयटीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे.

राहुल शेवाळे यांच्यावर महिलेनं केलेल्या आरोपात एसआयटी नेमण्याची मागणी ठाकरे गटाच्या मनिषा कायंदे यानी केली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी मनिषा कायंदे यांच्याकडून ज्येष्ठ नेत्यांचं ब्लॅकमेलिंग होत असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला होता.

यानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत फेसबूक लाईव्हही केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी संबंधित महिलेचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.

तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांचा मटक्याचा व्यवसाय असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केल्यानंतर खैरंच्या क्लिप आपल्याकडे असल्याचं बांगर यांनी म्हटले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विकासाच्या मुद्यावर चर्चा न होता, आरोप-प्रत्यारोपांच्याच फैरी झडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सत्ताधारी असोत वा विरोधक दोन्ही बाजूंनी आरोपांचा धुराळा आता सुरु झाला आहे. आरोपांची ही साखळी येत्या काही दिवसात अजून लांबण्याची चिन्हं मात्र दिसून येत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.