Russia Ukraine War : यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचं पहिलं विमान मुंबईत दाखल, विद्यार्थ्यांकडून सुटकेचा निश्वास
यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं पहिलं विमान संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास मुंबईत दाखल झालं आहे. 218 विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान रोमानियावरुन निघालं आणि शनिवारी संध्याकाळी हे विमान मुंबईत दाखल झालं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.
मुंबई : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. यूक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं पहिलं विमान संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास मुंबईत दाखल झालं आहे. 218 विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान रोमानियावरुन निघालं आणि शनिवारी संध्याकाळी हे विमान मुंबईत दाखल झालं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी विमानतळावर उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यावेळी मायभूमीत परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आला.
Welcome back to the motherland!
Glad to see the smiles on the faces of Indians safely evacuated from Ukraine at the Mumbai airport.
Govt. led by PM @NarendraModi ji is working relentlessly to ensure safety of every Indian. pic.twitter.com/fjuzjtNl9r
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 26, 2022
मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांचं स्वागत
यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले देशभरातील हजारो विद्यार्थी आणि नागरिक युद्धामुळे अडकले आहेत. अशावेळी त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्याची मागणी त्यांचे कुटुंबीय करत होते. रशियाच्या सातत्याने सुरु असलेल्या हल्ल्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठी संकटाला सामोरं जावं लागत आहे. त्यांना खंदकांमध्ये दिवस काढवे लागत आहेत. तसंच खाण्याचीही मोठी आबाळ होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने यूक्रेन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार रोमानिया आणि हंगेरी मार्गे या विद्यार्थ्यांना भारतात परत आणलं जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमानाने शनिवारी दुपारी रोमानियातून उड्डान घेतलं आणि शनिवारी संध्याकाळी ते मुंबईत दाखल झालं. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार पुनम महाजन, महापौर किशोरी पेडणेकर, भाजप आमदार पगार शाह, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.
Union Minister Piyush Goyal welcomes Indian students evacuated from Ukraine at Mumbai Airport pic.twitter.com/eqUfOuViyw
— ANI (@ANI) February 26, 2022
कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले?
- पुणे – 77
- ठाणे – 11
- पालघर – 7
- जळगाव – 5
- बीड – 2
- सिधुदुर्ग – 6
- य़वतमाळ – 2
- परभणी – 6
- अहमदनगर – 26
- जालना – 7
- अमरावती – 8
- बुलडाणा – 6
- चंद्रपूर – 6
- गडचिरोली – 2
- अकोला – 4
- सोलापुर – 10
- उस्मानाबाद – 11
- भंडारा – 4
- नागपूर – 5
- गडचिरोली – 2
- वर्धा – 1
- गोंदिया – 3
- सातारा – 7
- हिंगोली – 2
- नागपूर – 5
- औरंगाबाद – 7
- नांदेड – 29
- लातुर – 28
- रायगड – 26
- रत्नागिरी – 8
- सिंधुदूर्ग – 6
- धुळे – 0
- जळगाव – 9
- नाशिक – 7
- कोल्हापुर – 5
इतर बातम्या :