Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांचा महाराष्ट्र मर्द, शिंदे-फडणवीसांनी नामर्द बनवलं; संजय राऊतांचा घणाघात

Saamana Editorial on Eknath Shinde Devendra Fadnavis : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले! हे कसले शिवभक्त?, असा सवाल आजच्या सामनातून संजय राऊतांनी शिंदे सरकारला केला आहे. वाचा सविस्तर......

शिवरायांचा महाराष्ट्र मर्द, शिंदे-फडणवीसांनी नामर्द बनवलं; संजय राऊतांचा घणाघात
संजय राऊतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 8:16 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांना राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. तर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. काल महाविकास आघाडीने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढला होता. गेट वे ऑफ इंडिया परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत या मोर्चाची सांगता झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘गाढवांचे ब्रह्मचर्यही गेले! हे कसले शिवभक्त?’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

फडणवीस व त्यांच्या मिंधे सरकारने शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच, उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडेही शिवून ठेवली. एकंदरीत छत्रपती शिवराय अवमान प्रकरणात भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग उघडे पडले . त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचे ब्रह्मचर्यही निघून गेले . शिवप्रेमींवर कायद्याचा बडगा उगारणारे मिंधे सरकार राज्यात आहे . हे शिवरायांचे राज्य म्हणता येणार नाही . शिवरायांनी महाराष्ट्राला शूर आणि मर्द बनवले . फडणवीस – मिंधे वगैरे लोकांनी महाराष्ट्राला लाचार , बेइमान , नामर्द बनविण्याचे ठरवले आहे . शिवरायांचा महाराष्ट्र हा असा नाही . गाढवांनी ब्रह्मचर्यही घालवल्यावर दुसरे काय घडायचे !

एक ब्रह्मचारी गाढवाशी झोंबता हाणुनिया लाथा पळाले ते।

गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले, झाले तोंड काळे, जगामाजी।।

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी एका ब्रह्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची कथा अत्यंत विडंबनात्मक पद्धतीने सांगितली आहे. हा अभंग रचताना तुकाराम महाराजांना मोदी, फडणवीस, मिंधे, केसरकर, शेलार, अजितदादा अशी भाजपची टोळी दिसत होती काय ते सांगता येणार नाही, पण हेच वर्णन या मंडळींनाही तंतोतंत लागू पडले आहे.

महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळून पडताच जनमत तापले आहे व जनतेने सरकारविरुद्ध आंदोलन सुरू केले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर भ्रष्ट आणि शिवद्रोही सरकारला जोडे मारण्याचा कार्यक्रम झाला. लोकशाहीत अशी आंदोलने होणारच. भारतीय जनता पक्षानेही ती केली आहेत, पण आज त्यांचे सरकार राज्यात असताना त्यांना लोकशाही मार्गाने होणारी ही आंदोलने नकोशी झाली.

‘जोडे मारा’ आंदोलनात पोलिसांनी अडथळे आणले व मूर्खांचा कारभार असा की, छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी विरोधकांनी केलेल्या आंदोलनास विरोध किंवा प्रतिवाद म्हणून भाजपने एक फुटकळ आंदोलन केले. म्हणजे त्यांचे आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानाविरोधात झाले. विरोधासाठी विरोध करताना त्यांनी ते शिवरायांच्या मान-सन्मानाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले. तुकोबांच्या अभंगातील ब्रह्मचाऱ्यांने गाढवही गमावले होते. भाजपने स्वतःचे गाढवपण सिद्ध करून आपले उरले-सुरले ब्रह्मचर्य गमावले आहे.