गद्दारीचा स्टँप शिंदे गट पुसू शकत नाही, ठाकरे गटाच्या नेत्याने बंडखोर आमदारांची कुंडलीच मांडली
अपक्ष आमदारांची गरज नव्हती, तरीही उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळता यावा म्हणून त्यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री केले.
कोल्हापूरः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आज जी शिंदे गटावर टीका केली जात आहे. ती फक्त टीका नाही तर ती जनसामान्यांची भावना आहे. ती फक्त उद्धव ठाकरे सांगतात असं मत ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंडखोरी करून चाळीस आमदार आपल्या गटात सामील करुन घेतले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील नेत्यांनी आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी बोलणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
तर आता मात्र दुसऱ्यांदा गुवाहाटी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करण्यात आली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी शिंदे गटाची पातळी घसल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यावर बोलताना सचिन आहिर म्हणाले की, बोलण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले तरी, आपण कोणत्या पदावरून बोलता, आणि काय बोलतो हे महत्वाचे आहे. आपण टीका करताना त्या पदाची गरिमा तर घालवत नाही ना असा सवालही त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.
सचिन आहिर यांनी बोलताना महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठबळावर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
त्यावेळी अपक्ष आमदारांची गरज नव्हती, तरीही उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळता यावा म्हणून त्यांनी आमदार बच्चू कडू यांना मंत्री केले.
राजेंद्र यड्रावरकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नव्हते पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी मंत्रिपद दिली. त्यामुळे आता जरी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात असली तरी शिंदे गटावर जो गद्दारीचा शिक्का बसला आहे तो निघून जाणार नाही असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.