Sachin Kharat : …तर तुम्हाला राज्यातली जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, भाजपावर रिपाइंच्या सचिन खरातांचा हल्लाबोल

महाराष्ट्र राज्य शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी राज्य असूनसुद्धा भाजपा नेते अमित शाह महाराष्ट्र राज्यात धार्मिक राजकारण करत आहेत, अशी टीका सचिन खरात यांनी केली.

Sachin Kharat : ...तर तुम्हाला राज्यातली जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, भाजपावर रिपाइंच्या सचिन खरातांचा हल्लाबोल
अमित शाह यांच्यावर टीका करताना सचिन खरातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 11:08 AM

मुंबई : भाजपा (BJP Maharashtra) या पक्षाला फक्त धार्मिक राजकारण करायचे असेल तर त्यांनी तसे जाहीर करावे. मग तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील जनता नक्कीच घरी बसवेल, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (RPI Sachin Kharat) यांनी केली आहे. भाजपाच्या धार्मिक राजकारणावर त्यांनी टीका केली आहे. अमित शाह यांनी काल मुंबईचा दौरा केला. यावेळी त्यांनी गणेशोत्सव आणि गणेशदर्शनाचे निमित्त साधून मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आढावा आणि बैठक घेतली. मुंबई महापालिकेवर (BMC) भाजपाची सत्ता मिळवण्यासाठी आणि शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर धार्मिक राजकारणही भाजपाकडून होत आहे. यावरच सचिन खरात यांनी टीका केली आहे.

‘अमित शाह महाराष्ट्र राज्यात धार्मिक राजकारण करत आहेत’

आपल्या भारत देशात विविध धर्म, जाती, भाषा, प्रांत आहेत. त्यामुळे भारत कायम एक राहावा, म्हणून संविधाननिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून जोडले. तसेच महाराष्ट्र राज्य शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचे पुरोगामी राज्य असूनसुद्धा भाजपा नेते अमित शाह महाराष्ट्र राज्यात धार्मिक राजकारण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. भाजपा या पक्षाने ध्यानात ठेवावे, महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्माच्या, जातीच्या लोकांना धार्मिक राजकारण नको आहे. या सर्वांना विकास हवा आहे.

हे सुद्धा वाचा

‘राज्यातील जनतेला विकास हवा आहे’

गृहमंत्री अमित शाह काल मुंबईत आले. मात्र त्यांना धार्मिक राजकारणात अधिक रस असल्याचे दिसून आले. त्यामुळे खरेच भाजपा या पक्षाला फक्त धार्मिक राजकारण करायचे असेल तर त्यांनी जाहीर करावे. मग तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील जनता नक्कीच घरी बसवेल, असा इशारा देत सचिन खरात यांनी टीका केली आहे. काल अमित शाह मुंबईत आले. त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानीही ते गेले. गणपती दर्शन तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक त्यांनी बोलावली होती.

'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....
शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड
शिवाजीपार्कातील शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला भगदाड.
गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् पाळदी गावात 2 गटात राडा
गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या कारचा कट अन् पाळदी गावात 2 गटात राडा.
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?
लुप्त 'सरस्वती' पुन्हा पृथ्वीवर अवतरली? जैसलमेरमध्ये नेमकं काय घडलं?.
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?
फाडूनिया छाती 'पुन्हा' दाविले पवार, नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?
बीड सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाती, सुदर्शन घुले कुठं लपला?.
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.