Sachin Kharat : विनाशकाले विपरीत बुद्धी कुणाची याचं आत्मपरीक्षण करा, शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवरून सचिन खरातांचा फडणवीसांना टोला

जेव्हा देशात पहिल्यांदा भाजपाचे सरकार आले होते, तेव्हा तुम्ही 23 पक्षांना घेऊन सरकार बनवले होते. ते सरकार एका मताने पडले होते, याची आठवण सचिन खरात यांनी फडणवीस यांना करून दिली.

Sachin Kharat : विनाशकाले विपरीत बुद्धी कुणाची याचं आत्मपरीक्षण करा, शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवरून सचिन खरातांचा फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना सचिन खरातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 11:48 AM

मुंबई : 23 पक्ष घेऊन तुम्ही भारतात सरकार बनवले आणि 1 मताने पडले. त्याचबरोबर मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार बनवले, त्यावेळेस तुमची बुद्धी कुठे गेली होती, असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली होती. तसेच विनाशकाले विपरितबुद्धी असा टोला शिवसेनेला लगावला होता. याचा समाचार सचिन खरात यांनी घेतला आहे. शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार पुढे नेण्यासाठी एका विचाराने काम करीत आहेत. हे राज्यातील जनतेला माहीत आहे, असे ते म्हणाले.

‘…ते सरकार एका मताने पडले होते’

हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले, की आम्ही संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत, अशी घोषणा केली, असे खरात म्हणाले. एका विचाराने काम करणार असल्याचे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने सांगितले. मात्र यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाशकाले विपरितबुद्धी असा टोला शिवसेनेला लगावला होता. त्यावर सचिन खरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीसांना टोला

ते म्हणाले, की जेव्हा देशात पहिल्यांदा भाजपाचे सरकार आले होते, तेव्हा तुम्ही 23 पक्षांना घेऊन सरकार बनवले होते. ते सरकार एका मताने पडले होते, याची आठवण सचिन खरात यांनी फडणवीस यांना करून दिली. मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत जात जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनवले होते. त्यावेळी तुमची बुद्धी कुठे गेली होती, असा सवालदेखील त्यांनी केला. तसेच तुमच्या या भूमिकांमुळे विनाशकाले विपरितबुद्धी नेमकी कुणाची, याचे आत्मपरीक्षण करा, असा टोला सचिन खरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर भाजपाची टीका

राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली असून आगामी निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्र लढवणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे. त्यावर भाजपा तसेच शिंदे गटाने टीका केली आहे. त्याचबरोबर मनसेनेदेखील टोले लगावले आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.