Sachin Vaze : 96 लाखांची प्रॅडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज, NIA च्या हाती घबाड

NIA ने आता अजून एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत 5 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. आता NIAच्या अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी सुरु आहे.

Sachin Vaze : 96 लाखांची प्रॅडो, 55-55 लाखांच्या 2 मर्सिडीज, NIA च्या हाती घबाड
सचिन वाझे प्रकरणात NIA ने अजून एक मर्सिडीज कार जप्त केली असून, तिची तपासणी केली जात आहे.
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 6:21 PM

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात NIA कडून तपास मोहीम वेगानं सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणात NIA ने आता अजून एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे. सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत 5 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. आता NIAच्या अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी सुरु आहे. त्यामुळे या गाडीतून आता नेमकं कोणतं गूढ उकलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी NIAने एक स्पॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे.(Another Mercedes vehicle seized from NIA in Sachin Waze case)

गुरुवारी दुपारी NIAने दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती कार्यालयात आणण्यात आली. त्यानंतर NIA अधिकाऱ्यांकडून या गाडीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. NIA ने पहिल्यांदा स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली. पुढे सचिन वाझेंच्या चौकशीनंतर एक मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

पहिल्या मर्सिडीजमध्ये काय आढळलं?

मागच्या मर्सिडीजमध्ये केरोसीन, ५ लाख रुपये रोख, एक पैसे मोजण्याचे मशीन आणि शर्ट सापडले होते. आता जप्त केलेली दुसरी मर्सिडीज कोण वापरत होते?, वाझेच वापरत होते का? असे प्रश्न आहेत.

NIA ने आतापर्यंत 5 गाड्या ताब्यात घेतल्या आहे. शिवाय एक ट्रॅडो गाडी वाझेंच्या कपाऊंडमधून ताब्यात घेतल्याचं सागंण्यात येत आहे. ही गाडी अजून NIA कार्यालयात आणली गेलेली नाही. शिवाय एक स्कोडा कारही NIAच्या रडारवर आहे. एकूण सहा गाड्या आतापर्यंत समावेश आहे. मात्र आतापर्यंत 5 गाड्या हाती लागल्या आहेत.

NIA कडून प्रॅडो गाडीही ताब्यात

NIA ने जी टोयोटा प्रॅडो गाडी ताब्यात घेतली आहे, ती अत्यंत महागडी आहे. बेसिक मॉडेलची किंमत 96 लाख 30 हजारांपासून सुरु होते. या गाडीची इंजिन क्षमता 2982 सीसी इतकी आहे. या कारचं मायलेज 11 किलोमीटर प्रतिलीटर आहे. ऑटोमेटिक गिअर सिस्टिम आणि 7 सीटर असलेल्या या भारदस्त कारमध्ये 7 एअरबॅग्ज आहेत.

प्रॅडो कारची वैशिष्ट्ये

किंमत- 96 लाख 30 हजारांपासून सुरु

इंजिनची क्षमता- 2982 सीसी

इंजिनचा प्रकार – डिझेल इंजिन

मायलेज – 11 किलोमीटर प्रतिलीटर

ऑटोमेटिक गिअर सिस्टिम

7 सीटर, 7 एअरबॅग्ज

संबंधित बातम्या :

आमच्या अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका; निष्पक्ष चौकशीसाठी पोलीस आयुक्तांची बदली: अनिल देशमुख

NIA च्या चौकशीत धक्कादायक माहिती; वाझेंच्या गाडीत नोटा मोजण्याचं मशीन; फेसशिल्ड आणि कॅप जाळली

Another Mercedes vehicle seized from NIA in Sachin Waze case

Non Stop LIVE Update
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.