मोठी बातमी: सचिन वाझेंच्या हृदयातील दोन रक्तवाहिन्या 90 टक्के ब्लॉक; वकिलांची महत्त्वाची मागणी

वाझे यांच्या हदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अनेक ब्लॉकेज आढळून आले आहेत. | Sachin Waze NIA

मोठी बातमी: सचिन वाझेंच्या हृदयातील दोन रक्तवाहिन्या 90 टक्के ब्लॉक; वकिलांची महत्त्वाची मागणी
sachin waze
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 2:40 PM

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या प्रकृतीबाबत आणखी एक चिंतादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन रक्तवाहिन्या 90 टक्के ब्लॉक असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनी वकील आबाद पोंडा यांनी विशेष न्यायालयात सचिन वाझे यांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे. (90 percent blockage in Sachin Waze heart)

सचिन वाझे यांच्या कोठडीची मुदत शनिवारी संपत आहे. त्यामुळे वाझे यांना आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. न्यायालयाने सचिन वाझे यांचा वैद्यकीय अहवाल मागवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाझे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अनेक ब्लॉकेज आढळून आले आहेत. वाझे यांच्यावर वेळीच उपचार न केल्यास त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता एनआयए कोर्ट काय निर्देश देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत.

गेल्याच आठवड्यात सचिन वाझे यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांना जे.जे रुग्णालयात हलवण्यात आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास NIAच्या अधिकाऱ्यांनी वाझे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात नेले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर रात्री 1.30च्या सुमारास सचिन वाझे यांना परत आणण्यात आले.

यापूर्वीही चौकशीदरम्यान दोन-तीन वेळा सचिन वाझे यांची प्रकृती बिघडली होती. तेव्हादेखील एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले होते. याठिकाणी त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. तेव्हा सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले होते.

मीरा रोडच्या रुममध्ये 13 तास तपास

अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री वूमन’चं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे (NIA) पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली होती.

एनआयएने ताब्यात घेतलेली महिला 16 फेब्रुवारीला सचिन वाझेंसोबत दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसलेली महिला असल्याचा संशय आहे. संबंधित महिला वाझेंची निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

सचिन वाझे केस : मीना जॉर्जच्या नावे मीरा रोडमध्ये फ्लॅट भाड्याने, 13 तासांच्या तपासानंतर NIA महिलेसह मुंबईला रवाना

Sachin Vaze : सचिन वाझेच्या वापरातील अजून एक अलिशान ‘आऊटलँडर’ गाडी ताब्यात

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखायला लागल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ

(90 percent blockage in Sachin Waze heart)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.