‘सचिन वाझे राजकारणाचा बळी’, वाझेंच्या भावाची ‘हेबियस कॉर्पस’ याचिका
सचिन वाझे यांच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात बंदी प्रत्यक्षीकरण (हेबियस कॉर्पस) याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राष्ट्रीय तपास यंत्रणा सचिन वाझेंना झालेली अटक अवैध असल्याचं म्हटलंय.
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणात सचिन वाझेंवर झालेली अटकेची कारवाई अवैध असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात बंदी प्रत्यक्षीकरण (हेबियस कॉर्पस) याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राष्ट्रीय तपास यंत्रणा सचिन वाझेंना झालेली अटक अवैध असल्याचं म्हटलंय. वझे यांना राजकारणाचा बळी बनवण्यात आल्याचंही या याचिकेत म्हणण्यात आलं आहे.(Sachin Waze’s brother files habeas corpus petition in Mumbai High Court)
राजकीय नेत्यांनी बळीचा बकरा बनवलं?
सचिन वाझे यांच्या भावाने दाखल केलेल्या याचिकेत दावा केला आहे की, वाझे यांना राजकारणातील काही बड्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवलं आहे. त्यासाठी या प्रकरणाशी संबंधित मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांना माध्यम बनवण्यात आलं आहे. वाझे यांची अटक नियमांविरुद्ध आहे आणि एनआयए वाझेंच्या माध्यमातून अन्य कुणाला तरी निशाणा बनवू पाहत आहे. कारण एनआयए या प्रकरणात चुकीच्या धोरणातून कारवाई करत आहे. त्यातून वाझे यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात हजर केलं जावं आणि त्यांची मुक्तता केली जावी, असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
‘प्रसारमाध्यमं आणि समाज वाझे यांना निशाणा बनवत आहेत’
याचिकेनुसार मनसुख हिरेन यांच्या पत्मनी विमला यांनी दहशतवाद विरोधी पथक (ATS)कडे अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हिरेन यांच्या पत्नीने वाझेंवर कुठल्याही ठोस आधाराविना आरोप केले. आश्चर्याची बाब म्हणजे विमला हिरेन यांच्या आरोपानंतर लगेचच एनआयएने या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय. या एफआयआरनंतर सर्व प्रसारमाध्यमं आणि समाज वाझे यांना निशाणा बनवत आहे. त्यामुळे एक प्रकारे वाझे यांना या प्रकरणात बळीचा बकरा बनवलं जात आहे.
‘एनआयए’चा फास आणखी आवळला; सचिन वाझेंना 10 दिवसांची पोलीस कोठडी
मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने रविवारी 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला होता.
त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
Riyaz Kazi : वाझेनंतर NIA चौकशी करत असलेले API रियाझ काझी कोण आहेत?
सचिन वाझे यांना मधुमेहाचा त्रास, जेजे रुग्णालयात विविध आरोग्य तपासण्या
Sachin Vaze Case : पवार-मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक
Sachin Waze’s brother files habeas corpus petition in Mumbai High Court